‘धुंदी की बेधुंदी’ न उलगडलेलं कोडं; सविता पाटील ठाकरे

‘धुंदी की बेधुंदी’ न उलगडलेलं कोडं; सविता पाटील ठाकरे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे परीक्षण

साधारणतः २०-२१ वर्षाची तरुणी असेल ती…!! पण तिची ती अवस्था पाहून मला खूप वाईट वाटत होते. सर्व अंग रंगाने भरलेलं, चेहऱ्यावर सोनेरी, चंदेरी रंग, तिला ओळखणेही कठीण…! बहुतेक धुलीवंदनाची धुंदी चढलेली दिसत होती. जवळच दारूची बाटली होती, पुरती बेवडी दिसत होती. जरा पलीकडे एक मुलगा नशेत धुंद होवून पडला होता. माझा कयास की ती बहुतेक त्याच्यासोबत आलेली असेल. एका मोठ्या शहराजवळच्या एका टेकडीवरचे हे दृश्य पाहून मन हेलावले. त्या मुलीला कसलेच भान नव्हते. निर्मनुष्य जागेवरती कशी पोहोचली असेल?कपडे अस्ताव्यस्त, धड उभं राहणंही अशक्य. नशेच्या गर्तेत धुंद होऊन पडलेली ती तरुणी बहुतेक खेड्यातून शिक्षणासाठी या शहरात आलेली असेल. मन पार कोमजून गेलं माझं उन्हात फुल कोमजते तसे…!!!

धुंदीत राहू….. मस्तीत राहू…
छेडीत जाऊ… आज प्रीत साजना..
थंडी गुलाबी..हवा ही शराबी
छेडीत जाऊ…आज प्रीत साजणी….

असा काहीसा प्रकार असावा असे मला वाटले.
पण अशी ही धुंदी?? धुंदी की बेधुंदी???

मनाच्या धुंदीत ,लहरीत येना…
सखे गं,साजणी ये ना…
जराशी सोडून,जनरीत येना
सखे ग,साजणी येना…

कदाचित अशीही असेल त्याची तिला साद….पण त्याला नशेचा हा कैफ? कसं होईल आपल्या संस्कृतीचं ?आणि या तरुण पिढीचं? पाहिली आहे मी ही धुंदी…. पैशांची… एवढा कैफ की पैशासमोर माणुसकी, नातेगोते स्वस्तात विकतांना मी पाहिले. पाहिली आहे मी ही धुंदी.. सत्तेची… एवढा कैफ की लोकशाहीला हुंदके देताना मी पाहिले. मी टिकेल की नाही या भीतीने थरथरतानांही मी पाहिले. पाहिली आहे मी धुंदी… प्रेमाची… एवढा कैफ की तिच्यासाठी स्वतःची एक किडनी, तिही हसतमुखानं त्याला देतानांही मी पाहिले.

“धुंदी कळ्यांना… धुंदी फुलांना… शब्दरूप आले…मुक्या भावनांना..” मुक्या भावनांना… या मुक्या भावनांना धुंदीत हिंदळतांना मी पाहिले, हसतानांही पाहिले,रडतांनाही पाहिले. धुंदी….. अर्थात कैफ,नशा,अंमल. ही धुंदी का एकदा चढली की शून्यातून विश्व निर्माण करण्याचे सामर्थ्यही मी पाहिले, याच धुंदीत राहून धुंद झालेले धुरंदरही मी पाहिलेत.

गालावर खळी डोळ्यात धुंदी
ओठावर खुले लाली गुलाबाची
कधी कुठे कसा तुला सांग भेटू
वाट पाहतो मी एका इशाऱ्याची..

प्रेमाच्या गावात तर धुंदीत राहणं कायमचंच….!! आज ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेसाठी ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी ‘धुंदीत राहू’ हा विषय देऊन सर्व काव्य रसिकांच्या सर्जनशीलतेला सरळ हात घातला. आपणही सर्वजण यात खरे उतरतांना विविधांगी रचनांनी सर्व समूह धुंद अगदी बेधुंद केलात. तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन व पुढील लिखाणास अनंत कोटी शुभेच्छा.

सौ. सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, लेखिका, कवयित्री
©मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles