धुंदीत राहू
वसंताची हळुच चाहुल
आली भिरभिरत अंगणी
वनराईला बहर आलीत
चौफेर सजली हि धरणी.
निसर्ग सौंदर्य पाहण्या
टकमक रम्य दृष्य पाहू
आनंदाने नाचत गाजत
बेभान धुंदीत राहू.
सख्या सजना सवे
मनसोक्त आनंद लुटू
बिनधास्त पणे होऊन
मनातले भाव वाटू.
एकमेकांना समजून
ह्रदयातील भाव जाणुन घेऊ
ओठावरील आलेले अबोल शब्द
एकमेकांना पटवून देऊ.
पुष्पा डोनीवार
बाबुपेठ, चंद्रपूर
=========