फुंकर; वनिता गभणे

फुंकरपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

जेव्हा जेव्हा वेदनेने
छळले मला दिनरात
हवा होता तेव्हा मला
तुझा मायेचा हात…

तुझ्या एवढी माया
कुठे कुणाच्या काळजात?
मी वासरू एकटी
या भावनाहिन कळपात..

बाबांनी घालून वरमाला
गृहलक्ष्मी आणली घरात..
स्थानापन्न नाहीच झाली
मी कधी त्या मनात…

तुझ्या स्नेह सहवासाची
आस जागते या तनात…
रोज घायाळते मन माझे
या बोचऱ्या काटेरी वनात..

तुझ्याविना उषण वाटतो
इथला मधुर दहीभात…
ये ना गं परतूनी जवळी
घे मला तुझ्या कुशीत…

का गं जाऊन वसलीस तू
त्या दूरच्या नभांगणात…
मायेची फुंकर माझ्या
नाहीच का गं प्रारब्धात..?

वनिता गभणे
आसगाव भंडारा
==============

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles