लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 1351 उमेदवार रिंगणात

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 1351 उमेदवार रिंगणात



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील 95 लोकसभा मतदारसंघांतून 2963 उमेदवारी अर्ज दाखल_

बिनधास्त न्यूज वृत्तसेवा

नवी दिल्‍ली: लोकसभा निवडणूक 2024 च्या तिसऱ्या टप्प्यात देशभरातील 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 1351 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यामध्ये मध्यप्रदेशातील निवडणूक स्थगित करण्यात आलेल्या 29-बैतुल (एसटी) या मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या 8 उमेदवारांचा देखील समावेश आहे. तसेच गुजरातमधील सुरत मतदार संघातून एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. या सर्व 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये उमेदवारी मागे घेण्यासाठी 22 एप्रिल 2024 पर्यंतची मुदत होती.

2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी या 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील 95 लोकसभा मतदारसंघांतून (29-बेतुलसह) एकूण 2963 उमेदवारी अर्ज भरण्यात आले.या सर्व 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसाठी तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत 19 एप्रिल 2024 रोजी संपली. दाखल झालेल्या सर्व अर्जांच्या छाननीनंतर 1563 अर्ज वैध ठरले.

तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी गुजरातमधील 26 लोकसभा मतदारसंघांतून सर्वाधिक 658 उमेदवारी अर्ज सादर झाले. त्याखालोखाल महाराष्ट्रातील 11 लोकसभा मतदारसंघांतून 519 उमेदवारी अर्ज सादर झाले. महाराष्ट्रामध्ये 40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून राज्यातील सर्वाधिक 77 उमेदवारी अर्ज दाखल झाले तर त्याखालोखाल छत्तीसगडमध्ये 5-विलासपूर लोकसभा मतदारसंघात 68 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles