पुस्तकं भेट देऊन ‘पुस्तकदिन’ साजरा; उत्कर्ष प्रकाशनाचा उपक्रम

पुस्तकं भेट देऊन ‘पुस्तकदिन’ साजरा; उत्कर्ष प्रकाशनाचा उपक्रम



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_निवेदक सुधीर गाडगीळ यांची विशेष उपस्थिती_

अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी

पुणे: आयुष्यात येणाऱ्या सुखदुःखाचा अर्थ सांगणारे आणि संकटाशी झुंज देताना मनोधैर्य टिकवून कसे जगावे याची शिकवण देणा-या पुस्तकांना मित्र मानून पुस्तकावर प्रेम करण्याचा संदेश देणारा अनोखा कार्यक्रम अखिल भारतीय साहित्य परिषद, पुणे व उत्कर्ष प्रकाशन यांनी संयुक्तपणे आयोजित केला होता.

कार्यक्रमास ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांची विशेष उपस्थिती लाभली होती. उपस्थित सर्व मान्यवर आणि निमंत्रितांना उत्कर्ष प्रकाशनाच्या वतीने पुस्तक भेट देण्यात आली.यामुळे ख-या अर्थाने जागतिक पुस्तकदिन पुस्तकमय होऊन गेला.

कार्यक्रमाचा शुभारंभ मनोमय भुर्के या बाल कलाकाराच्या सुरेल बासरी वादनाने झाला. गीता भुर्के यांनी सरस्वती वंदना सादर केली. उत्कर्ष प्रकाशनाचे श्री. सु. वा. जोशी यांनी प्रास्ताविक केले. या वेळी प्राचार्य श्याम भुर्के यांनी उपस्थितांशी संवाद साधला. एकेकाळी गाजलेल्या वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, गो. नि. दांडेकर, नाथमाधव इ. साहित्यिकांच्या पुस्तकांचे स्मरण करून देताना लोकप्रिय पुस्तकांची वाचकांवर असणारी जादू त्यांनी वर्णन केली व जीवनात वाचनाचे महत्वं पटवून दिले.

डॉ. अनुजा कुलकर्णी यांनी आयुष्यात येणाऱ्या संकटाना तोंड देण्याचे धैर्य वाचनामुळे येते म्हणून पुस्तकांवर भरभरून प्रेम करावे, असे सांगितले. सुलभा कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास अ.भा. परिषदेचे सर्व पदाधिकारी, उत्कर्ष प्रकाशनाचा मित्रपरिवार, लेखक व रसिक श्रोते उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles