बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेतील रचना

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🥀विषय : समाजव्रत🥀*
*🍂बुधवार : २४ / एप्रिल /२०२४*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*समाजव्रत*

समाजव्रत घेतलंया हाती
समाजसेवा करू जनतेची,
निवडून द्यावे तुम्ही आम्हा
हिच अपेक्षा आहे नेत्यांची…

एकास एकचं मताधिकार
लोकशाही घटना अधिकार,
असो गरीब ,श्रीमंत कोणी
सर्वांना समान मताधिकार…

आश्वासनाची सूरू खैरात
प्रत्येक उमेदवार नेत्याची,
लोकशाहीची ठरे कसोटी
मते बदलण्यास जनतेची…

पारख करुन सत्य असत्य
निवडून द्या योग्य उमेदवार,
वाटेल तुम्हा आहे योग्य तो
निवडण्या तुम्हा अधिकार…

सगळेच करतील दावा तो
गुणगान आपल्या कार्याचे,
सदसद विवेकबुद्धी गहान
ठेवून मतदान ना करायचे…

समाजसेवक उमगण्या ती
मिळाली तुम्हां नामी संधी,
समाजव्रत द्यावे कोण हाती
ठरवावे प्रत्येकाने मनामधी…

*✍️बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️🎋✍️➿➿➿➿
*समाजव्रत*

मनुष्य जन्म किती हा सुंदर
सगळं चाले मन मर्जीनुसार!

समाज असे परिवर्तनाचे द्वार
विचारांची नीती रे समजदार!

दिसेल नक्की प्रगतीचे द्वार
समाजव्रत करावे स्वीकार!

समाजसेवा करा विनातक्रार
मान सन्मान मिळेल निरंतर!

चांगले वाईट दिसते बरोबर
ठेवायचा भरोसा कुणावर!

समाज व्यवस्था जबाबदार
घडविण्या माणूस जरूर!

मनशांतीचा घ्यावा आधार
समाजव्रताचे हे परोपकार!

नितीमुल्य जपावे निरंतर
समाजवृत्ताची कडवी धार!

समाजविना नाही रे उद्धार!
समाजऋणाचा पडे विसर!!

*अशोक महादेव मोहिते*
*बार्शी,जिल्हा सोलापूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार *समूह*
➿➿➿➿✍️🎋✍️➿➿➿➿
*समाजव्रत*

देव मी पाहिला माणसात
समाजव्रत स्विकारणार
तन-मन-धन कार्यासाठी
अर्पून अपेक्षा न बाळगणारा

मानसेवा हीच ईश्वरसेवा
कार्य करणाऱ्यांनी मानली
अन् सिंधुताई सकपाळ
अनाथांची माई बनली

कुष्ठरोग्यांसाठी बाबा आमटेंनी
आपले संपूर्ण आयुष्य वाहिले
या समाज कार्यासाठी आपले
विलासी जीवनही त्यागीले

माणुसकीच नातं जपावं
माणुसकीचा धर्म पाळावा
देव मंदिरात नाही तर
देव माणसात पाहावा

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️🎋✍️➿➿➿➿
*समाजव्रत*

समाजव्रत असिधारा व्रत
खेळतेय सार जग
सांभाळायला आहे जड
काय करावे सामान्यांनी मग ॥१॥

जग असत फसवं
वास्तवाची सोडून नाळ
मागे मागे पळती लोक
खेळती खेळ ॥२॥

मैदानी खेळात
गाजवती समाजव्रत
गुंतुन दुनियेत
करती सरशी जोरात ॥३॥

जीवाला जीव लावत
भेदभाव विसरत
जपती समाजव्रत
आयुष्याची घडी बसवत ॥४॥

सारेच आहे आभासी
कोणाला कोण विचारी
सांगा ना देशवासी
घ्यावी कशी भरारी ॥५॥

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️🎋✍️➿➿➿➿
*समाजव्रत*

सामाजिक बांधिलकीची
आजकाल घसरलीय प्रत
येथे असा कोणीही नाही
जो चालवेल समाजव्रत… //

इथे सत्वशिल चारित्र्याचे
आज आहेत कितीसे नेते
तत्त्वनिष्ठा जोपासण्याची
सांगा तसदी कोण घेते…?

समाजकारण करता यावे
कधी हा निर्मळ हेतू होता
फक्त यासाठी राजकारण
हा एक प्रभावी सेतू होता.. //

होवून गेलेत आदर्श नेते
शास्त्री, अटलजी, कलाम
समाजव्रतास नेटाने जपले
अशा थोर विभूतींना सलाम… //

सुसंस्कृत राजकारणाचा
आज जपतो कोण वारसा
केवळ सत्तेच्या खुर्चीसाठी
नितिमूल्ये झालीत खालसा.. //

आज साम,दाम,दंड, भेद
हीच एकमेव उरली निती
समाजव्रत घातले चुलीत
पिढ्यान पिढ्या मेवा खाती… //

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️🎋✍️➿➿➿➿
*समाजव्रत*

होय, समाजव्रत घेतले होते त्यांनी
माणसाला माणूस जोडण्यासाठी
इतिहास साक्षी पुरावा आहे….
धर्म जात वंश यापलीकडे जाऊन
एक भारतीय म्हणून लढले होते ते
गुलामगिरीच्या काळोखातून…..
आपल्या बांधवांना मुक्त करण्यासाठी
हिंदू मुस्लिम शीख ईसाई…..
असा कुठलाही धर्म बघितला नव्हता
मातृभूमीच्या रक्षणासाठी……
आज वासेच फिरले घरासोबत देशाचे
जुने मुडदे उकरुन भांडताहेत…..
कोणी काय केले कुणी काय नाही केले
परिस्थिती सापेक्ष असती साऱ्या घडामोडी
म्हणूनच त्यांनी काय केले काय नाही केले
हे सांगण्यापेक्षा… तुम्ही काय करता ते सांगा
कुचाळक्या करण्याऐवजी…..
आणि लोकांचे मेंदू सडवण्याऐवजी……
अन् हो, सोशल मिडिया आला आहे
माणसाला माणूस जोडण्यासाठी….
नव्हे चिखलफेक करुन माणसे तोडण्यासाठी

*सौ.वैशाली अंड्रस्कर,चंद्रपूर*
*कवयित्री/लेखिका*
*©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️🎋✍️➿➿➿➿
*समाजव्रत*

अंधश्रध्देच्या खाईत
बुडाला होता समाज
गुलामीच्या मुसक्याने
दबला होता आवाज …
सत्तांध झाला नेता
धर्मांध झाली जनता
जातीभेदाच्या सावटाखाली
झाली निर्जिव मानवता …
सारी समाजव्यवस्था
सैरभैर झाली
माय लेकींची अब्रू
रस्त्यावर आली …
क्रांतीच्या तेजाने
नवसूर्य उगवला
समाजव्रत घेऊन
माणूस चेतवला …
फुले , शाहू , बाबांची
नवी विचारधारा
जागृत केला
भारत सारा…
सर्वस्व त्यागून
समाज व्रत घेतले
संपवून गेले त्यांना
राजकारण आतले . . .
विचारांची ज्योती
विझेल का कधी
पेरले ते समाजव्रत
संपेल का कधी

*सरला टाले*
*राळेगाव जि. यवतमाळ*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️🎋✍️➿➿➿➿
*समाजव्रत*

जन्मलो ज्या समाजात
त्याचे काही देणे लागते
समाजव्रती व्हायचं मला
स्वप्न मनी ठरवल्या जाते

शेजारी,मित्र समाजाशी
संबंध येतात जिव्हाळ्याचे
सुख दुःखात त्यांच्या पाठी
कर्तव्य करत जगायचे

गरीबी,बेकारी,दिव्यांग
असे अनेक समस्या
प्रश्न त्यांचे सोडवण्या
वाचा प्रश्नांना फोडू या

भेदाभेद,उच्चनिचता
समाजातील कलंक
समुपदेशन करून
करू परिवर्तन वैचारिक

होऊन गेले अनेक व्रती
जे समाजासाठी जगले
आदर्श तयांचा घेऊन
प्रेरणा कार्याची फुले

*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️🎋✍️➿➿➿➿
*समाजव्रत*

चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून
मनुष्य जन्म हा मिळे..
सार्थक करावं जन्माचं
सहज कुठे कोणा कळे?

तो करतोय,तो करेल
म्हणत कशाला बसायचं?
आपण आपल्या कर्तव्यात
पुढे सारखं असायचं..

कर्मकांड करता तुम्ही
कुठे विरोध आहे..?
पाण्यात फेकता निर्माल्य
खरंच इथे ..शल्य आहे..

कंपन्या टाका,दुकानं चालवा
विरोध कुठे आहे..?
भेसळ,डुप्लिकेटने जीव घेता
इथे .. शल्य आहे..

दवाखाने,कोर्ट, संस्थानं
विरोध कुठे आहे?
लुटता भरदिवसा
इथे..शल्य आहे..

विकास विकास विकास
विरोध कुठे आहे..?
मूल्य हरवत चाललंय
इथं.. शल्य आहे..

कायदा हवा.. कानून हवा..
विरोध कुठे आहे?
विरोध झाला की इ.डी. मागे
इथे.. शल्य आहे..

समाजव्रत मी घेतलेयच
डोळे उघडे ठेवून बघायचं..
आणि काहीही झालं तरी
समाजहिताचं वागायचं..
समाजहिताचंच वागायचं..

*सौ संगीता पांढरे*
*इंदापूर,पुणे*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️🎋✍️➿➿➿➿
*समाजव्रत*

समाजव्रत जोपासून
ठेवू आपुलकीचे नाते
आपल्याच समाजाशी
मन एकरूप होऊन जाते

भान राखून कर्तव्याचे
फेडावे समाजाचे ऋण
जवळीक वाढत मनांशी
व्हावे कलामध्ये निपुण

माणूस म्हणून जगताना
समाजव्रत हाती घ्यावे
दु:खितांच्या जीवनात
सर प्रेमाची होऊन बरसावे

कोण काय म्हणेल याची
पर्वा तरी कशाला करावी
प्रेमाची आठवण जपताना
नात्यांची ओंजळ भरावी

सर्वांच्या भल्यासाठी आता
अंगीकार करावा एकवार
आपल्या सभोवतालच्या
नागरिकात आनंद अपार

सत्याच्या शोधात निघताना
आपल्याला असावे खरे भान
समाजाशी निगडीत असून सारे
आयुष्यात ठरू आपण भाग्यवान

कितीतरी सुंदर जबाबदाऱ्या
उत्तमपणे सारे पार पाडू चला
सकारात्मक दृष्टी प्राप्त करून
सन्मार्ग एकमेव ठरवूया भला

*सचिन पाटील*
*अलिबाग, रायगड*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️🎋✍️➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles