
जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोली शहरातील फुले वॉर्डात आज 24 जूनला भल्या सकाळी एक मोठे हत्याकांड उघडकीस आले आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते दुर्योधन रायपूरे (वय वर्षे जवळपास 49) यांची हत्या झाल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, दुर्योधन रायपूरे हे गडचिरोली शहरातील फुले वॉर्डात वास्तव्यास होते. गोरगरिबांची कामे करणे आणि सामाजिक कार्य करणे हा त्यांचा नित्यक्रम होता. मात्र आज अचानक सकाळी त्यांचा मृतदेह त्यांच्या घरी आढळून आला. त्यांची हत्या झाल्याचे उघडकीस आले. परंतु मारेकरी नेमके कोण, याबाबत अद्याप उलगडा झाला नाही. गडचिरोली पोलिस त्यादिशेने तपास करीत आहेत.