
अहेरीचे एसडीपीओ अमोल ठाकूर यांची धडक कारवाई, 28 लाखाच्या मुद्देमालासह देशी दारू जप्त
दिनांक 15/08/2021रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांना सहाचाकी वाहनातून देशी दारु वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर व त्यांचे पथकांनी चामोर्शी तालुक्यातील अड्याल गावाजवळील जंगलात सपडा रचून आयसर वाहन क्र. Mh 21-x- 3960 या वाहनाची तपासणी करण्याकरिता वाहन थांबविले असता वाहनातील 5 ते 6 जन गाडीतून उतरून जंगलात पडून गेले परंतू वाहन चालक खुशाल गंगाराम बोरकुटे रा. किस्तापुर, ता. चामोर्शी, जिल्हा गडचिरोली हा मिळून आल्याने त्यांचेकडे केलेल्या चौकशीत पडून गेलेले इसम 1) विश्वजित राप्तान ठाकूर २) राजू राप्तान ठाकूर ३) कुमरीस राप्तान ठाकूर ४) असीम राप्तान ठाकूर, सर्व रा. सित्तरजनपुर ५) शंकर सुखदेव राय रा. बोरी असे सांगितले त्यानंतर गाडी आष्टी वरून येत असताना पोलीसांनी वाहनाची तपासणी केली असता गाडीच्या आतील कप्यामध्ये ९० ml मापाने भरलेले १०० निपा याप्रमाणे २५८ देशी दारूचे बॉक्स असे एकूण २५८०० नीपा किंमत १८ लाख ६ हजार तसेच आयासर वाहनांची किंमत १० लाख असा एकूण २८ लाख ६ हजार रुपयाचा मुद्देमाल पकडण्यात आला. सादर कारवाई अमोल ठाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी व त्यांचे पथक नापोशी/२३९५ मनोज कूनघाडकर, चानापोशी/३४९६ श्रीकांतभांडे , चापोशी/३०११ नितीन पाल, पोशी/५३८३ वडजू दहिफडे, पोशि/३७१३ उधव पवार, spo तिरुपती मडावी, कुणाल संतोषवार यांनी केली असून पोलीस स्टेशन आष्टी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे. पुढील तपास अमोल ठाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी हे करीत आहेत. सदर आरोपी विरुद्ध म. दा.का.65अ ,83 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी दिली .