
यावर्षीच्या खरीप हंगामात पावसाचे प्रमाण अल्प असून बऱ्याच शेतकऱ्यांचे रोवणीचे कामे खोळंबली आहेत, त्यामुळे आरमोरी तालुक्यातील शेतकरी हा अस्मानी सुलतानी संकटात सापडला असून प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून आरमोरी तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिव सेना व युवा सेना शाखा आरमोरी च्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना केली आहे.
यावर्षी हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या आशा प्रफुल्लित झाल्या होत्या परंतु सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी झाल्याने तलाव,बोड्या रिकाम्या आहेत त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या धान रोवणी चे कामे खोळंबली असून हलक्या धानाचे पऱ्हे हे निसवण्याच्या मार्गावर आहेत ज्या शेतकऱ्यांनी तळ्या, बोळ्यांमध्ये थोडेफार पाणी साचलेले होते त्या पाण्याने कसेबसे धानाची रोवणी केली परंतु गेल्या दहा पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारल्याने रोवणी झालेले धानपीक सूकत आहेत त्यामुळे शासनाने तालुक्यातील शेत जमिनींचे पंचनामे करून लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आरमोरी तालुका शिवसेना व युवा सेनेच्या वतीने करण्यात आली यावेळी युवा सेना माजी जिल्हाप्रमुख चंदू बेहरे सभापती सागर मने, भूषण सातव, लहानु पिलारे, रामदास डोंगरवार, पुंजीराम मेश्राम, माजी जि. प. सदस्यता वेणुताई ढवगाये, नगरसेवक माणिक भोयर, कवळू सहारे, मेघा मने, शैलेश ढोरे, विजय मुरवतकार,शैलेश चिटमटलवार, अनिल पारधी,उल्हास बनपूरकर, वसंत गेडाम, ज्ञानेश्वर ढवगाये, राजू ढोरे किशोर मेश्राम सतीश गुरनुले टिकाराम खेवले आदी मान्यवर उपस्थित होते.