महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी डॉ. नितीन कोडवते, रवींद्र दरेकर, पंकज गुड्डेवार यांची नियुक्ती

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. त्यात गडचिरोली जिल्ह्यातील तीन प्रभावी नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. डॉ. नितीन कोडवते, रवींद्र दरेकर, पंकज गुड्डेवार या तिघांना प्रदेश काँग्रेसचे सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

डॉ. नितीन कोडवते

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून रात्री उशिरा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. त्यात गडचिरोली जिल्ह्यातील तीन नेत्यांचा सचिव म्हणून समावेश करण्यात आला आहे. डॉ. नितीन कोडवते हे गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील प्रभावी नेतृत्व आहेत. गडचिरोलीमध्ये गोरगरीब, सामान्य जनतेच्या आरोग्य सेवेसाठी त्यांनी शांताई हॉस्पिटलच्या माध्यमातून गेल्या 8 वर्षांपासून कार्य सुरू ठेवले आहे. काँग्रेस वाढीसाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले असून लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्याची झलक सर्वांना पहावयास मिळाली. एक मजबूत आणि विजयी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. त्यांच्या सौभाग्यवती डॉ. चंदा कोडवते यादेखील पक्षाच्या कामात सक्रिय आहेत. विधानसभा निवडणुकीत त्यांनी लक्षवेधी मतदान खेचून घेत पक्षाचे नावलौकिक केले होते. त्यांची यापूर्वीचं महिला काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीत वर्णी लागली होती. शिवाय डॉ. नितीन कोडवते यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याच्या आदिवासी आघाडीचे अध्यक्षपद सोपविण्यात आले होते. आता डॉ. नितीन कोडवते यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

खासदार राहुल गांधी यांच्यासोबत रवींद्र दरेकर

याशिवाय जेष्ठ नेते रवींद्र दरेकर व खासदार राहुल गांधी यांच्या टीममधील पंकज गुड्डेवार यांनाही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेस वाढीसाठी हे तीन नेते प्रभावी ठरतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

खासदार राहुल गांधी यांच्यासोबत पंकज गुड्डेवार

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles