नगरपंचायत निवडणूक : नामांकन दाखल करण्यासाठी सर्वत्र उसळली गर्दी, गडचिरोली नगराध्यक्षपदासाठी आज कोण घेणार माघार

गडचिरोली जिल्ह्यातील नऊ नगरपंचायतिची निवडणूक येत्या 21 डिसेंबरला होणार आहे. या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची आज मंगळवार, 7 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे सर्व नऊ ठिकाणी नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार व त्यांच्या समर्थकांची गर्दी उसळली असल्याचे पाहावयास मिळत आहे. दुसरीकडे गडचिरोली नगरपालिका अध्यक्षपदासाठी नामांकन दाखल केलेल्या दोन उमेदवारापैकी आज कोण माघार घेते, याकडेही लक्ष लागले आहे. 9 डिसेंबरला ही निवडणूक होणार आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील नऊ नगरपंचायतिची सार्वत्रिक निवडणूक 21 डिसेंबरला होत आहे. त्यासाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपुष्टात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार व त्यांच्या समर्थकांची गर्दी पहावयास मिळत आहे. कोरची, कुरखेडा, धानोरा, चामोर्शी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, मुलचेरा, तसेच अहेरी या ठिकाणच्या नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. आज नामांकन दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे सर्वत्र गर्दी पहावयास मिळत आहे. 21 डिसेंबर रोजी या निवडणुकीसाठी मतदान घेण्यात येणार आहे, तर 22 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
दुसरीकडे, गडचिरोली नगरपालिका अध्यक्षपदासाठी 9 डिसेंबर रोजी निवडणूक होत असून भारतीय जनता पक्षाच्या दोन नगरसेविकांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत. त्यात अल्का पोहनकर व पूजा बोबाटे यांचा समावेश आहे. यातून आज कोण माघार घेते, याकडेही लक्ष लागले आहे. प्राप्त माहितीनुसार, अल्का पोहनकर या भाजपच्या अधिकृत उमेदवार असल्याची माहिती आहे. दुसरीकडे, पूजा बोबाटे या भाजपच्या दुसऱ्या गटाच्या उमेदवार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत काय घडेल, हे आजच्या माघारीवर अवलंबून असणार आहे.



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles