
गडचिरोली येथील चांदाळा मार्गावरील गोटूल भूमीवर 8 ते 16 जानेवारी या कालावधीत अप्पर-डीप्पर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात चार संघ सहभागी होणार आहेत. त्यात विविध क्षेत्रातील खेळाडू सहभागी होणार आहेत. यात पत्रकार, डॉक्टर, व्यवसायिक, कंत्राटदार, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील मंडळी खेळाडू म्हणून सहभागी होतील. 8 जानेवारीला उद्घाटन, तर 16 जानेवारीला समारोप होईल. प्राणहिता पॉवर, इंद्रावती आयडॉल, गोदावरी गलक्सी, वैनगंगा वॊरीअर्स असे चार संघ या स्पर्धेत आपापसात भिडतील.