कायद्याच्या अभ्यासातून सजग व्हा, आरमोरीत जनजागृतीपर कार्यक्रम

लोकांना सजग व्हायचं असेल, तर कायद्याच्या अभ्यासातून जावं लागेल, असा सूर आरमोरीत आयोजित एका कार्यक्रमात उमटला.

अनुसूचित क्षेत्रातील नागरिकांचे हक्क आणि अधिकार अबाधित राखून घटनात्मक तरतुदी नुसार ग्रामसभांनी मालकी गाजवायची असेल तर त्यासाठी कायद्यांचा अभ्यास असणे आवश्यक आहे, त्यासाठीच गाव गणराज्य ग्रामसभा परिषदेच्या वतीने व्यवस्था शिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून जिल्हाभरातील ग्रामसभांच्या नविन कार्यकर्त्यांसाठी निरंतरपणे प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.या प्रशिक्षणाचा ग्रामसभांच्या युवक-युवतींनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहनही सैनूजी गोटा यांनी यावेळी केले.



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गाव गणराज्य ग्रामसभा परिषद, गडचिरोलीच्या वतीने आरमोरी येथील मारकवार फार्म हाऊसवर दि.२८ ते ३० जानेवारी २०२२ दरम्यान तीन दिवशीय ” व्यवस्था शिक्षण कार्यशाळा” आयोजित करण्यात आलेली होती.
या कार्यशाळेत स्वातंत्र्यापूर्वीचा भारत आणि आदिवासींचा संघर्ष, अनुसूचित क्षेत्राकरीताच्या संविधानीक तरतुदी, पाचवी अनुसूची, पेसा कायदा १९९६, ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम ५४,पेसा नियम २०१४ याबाबत भाई रामदास जराते यांनी मार्गदर्शन केले. वृक्षवल्ली वन्यजीव संस्थेचे अध्यक्ष देवानंद दुमाने,दिपक सोनकुसरे यांनी सापांची ओळख याविषयी तर जंगलावरचा उद्योग आणि रोजगार याविषयी अमोल मारकवार यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेमध्ये जिल्ह्यातील विविध ग्रामसभांचे युवक-युवती सहभागी झाले होते.
कार्यशाळेच्या समारोपीय सत्राला सुरजागड पारंपारिक इलाख्याचे प्रमुख आणि जिल्हा परिषद सदस्य सैनूजी गोटा, शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, जयश्री वेळदा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ अमोल मारकवार, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे काॅ. वृक्षवल्ली वन्यजीव संस्थेचे देवानंद दुमाने, दिपक सोनकुसरे, प्रहार चे निखिल धार्मिक, मनसेचे रंजित बनकर,युवारंग क्लबचे राहुल जुवारे, दिपक गोंधळे, चक्रधर मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles