पहिल्याच एंट्रीत गुजरातने पटकावले विजेतेपद

*नवा गडी, नवं राज्य…*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*पहिल्याच एंट्रीत गुजरातने पटकावले जेतेपद*

*हार्दिक ठरला हुकमी एक्का*

अहमदाबाद : पहिल्यांदाच उतरलेल्या गुजरात टायटन्सच्या संघाने आयपीएलच्या जेतेपदाला गवसणी घातली. त्यामुळेच आयपीएलमध्ये यावर्षी नव्या संघानेच राज्य केल्याचे पाहायला मिळाले. हार्दिक पंड्याने कर्णधाराला साजेसा अष्टपैलू खेळ केला आणि गुजरातच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. हार्दिकच्या भेदक गोलंदाजीपुढे राजस्थानला गुजरातपुढे विजयासाठी १३१ धावांचे आव्हान ठेवले होते. पण गुजरातने या आव्हानाचा सात विकेट्स राखत यशस्वी पाठलाग केला आणि आयपीएलचा चषक उंचावला.

▪️गुजरात टायटन्सने आयपीएलमध्ये मारली बाजी▪️
गुजरात टायटन्ससाठी पहिला हंगाम स्वप्नवत ठरला आहे. यंदाच्या हंगामात पदार्पण करणाऱ्या गुजरातने दमदार खेळाच्या बळावर अंतिम फेरी गाठली. हार्दिक पंड्याने दुखापतीतून सावरत गुजरातचं यशस्वी नेतृत्व करून बाजी मारली आहे. राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या पहिल्यावहिल्या हंगामात जेतेपदावर नाव कोरलं होतं. शेन वॉर्नच्या नेतृत्वात युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या राजस्थान संघाने अद्भुत कामगिरी करत जेतेपदाची कमाई केली होती.

प्राथमिक फेरीत या दोन संघांमध्ये झालेल्या लढतीत गुजरातनेच विजय मिळवला होता. अंतिम लढतीसाठी राजस्थानने प्लेऑफ लढतीतला संघ कायम ठेवला तर गुजरातने अल्झारी जोसेफऐवजी लॉकी फर्ग्युसलनला संघात समाविष्ट केलं. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला. आम्ही गोलंदाजीच केली असती असं गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने सांगितलं. यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर यांनी 31 धावांची सलामी दिली. यश दयालच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न साई किशोरच्या हातात जाऊन विसावला.

यंदाच्या हंगामात अविश्वसनीय फॉर्मात असणाऱ्या बटलरने कर्णधार संजू सॅमसनसह धावफलक हलता ठेवला. बटलरने यंदाच्या हंगामात चार शतकं झळकावली आहेत. बटलरच्या शतकाच्या बळावरच राजस्थानने अंतिम फेरीत धडक मारली होती. संजू सॅमसनला पंड्यानेच बाद केलं. संपूर्ण हंगामात धावांसाठी झगडणाऱ्या संजूला अंतिम लढतीतही सूर गवसला नाही. त्याने 14 धावा केल्या. सलामीऐवजी मधल्या फळीत खेळणाऱ्या देवदत्त पड्डीकलला रशीद खानने माघारी धाडलं. 10 चेंडूत 2 धावांमुळे राजस्थानच्या अन्य फलंदाजांवरचं दडपण वाढलं.

परपल कॅपचा मानकरी होणार असलेल्या जोस बटलरला हार्दिकने बाद करत राजस्थानला सगळ्यात मोठा धक्का दिला. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या बटलरला बाद करत हार्दिकने सामन्याचं पारडं गुजरातच्या बाजूने फिरवलं. बटलरने 5 चौकारांसह 39 धावांची खेळी केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles