हार्दिक पटेल ‘कमळा’बाईच्या रथावर होणार स्वार

हार्दिक पटेल ‘कमळा’बाईच्या रथावर होणार स्वार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_सोबत दीड हजार कार्यकर्ते करणार भाजपात प्रवेश_

गांधीनगर :- गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल २ जून रोजी भाजपामध्ये (BJP) प्रवेश करणार असून ‘कमळा’बाईच्या रथावर स्वार होणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यांच्यासोबत १५०० कार्यकर्तेही भाजपात प्रवेश करणार आहेत. यामुळे भाजपाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

हार्दिक पटेल यांनी नुकताच काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. ते गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष होते. सातत्याने होत असलेल्या उपेक्षेमुळे ते नाराज होते. ते गांधीनगर येथील भाजपायाच्या मुख्यालयात भाजपात प्रवेश करतील. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना हार्दिक पटेल यांनी २ जून रोजी भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची पुष्टी केली. भाजपा प्रदेशाध्यक्ष सी. आर.पाटील त्यांना भाजपाचे सदस्यत्व देतील. हार्दिक यांच्या सोबत त्यांचे काही समर्थकही भाजपत दाखल होणार आहेत. हार्दिक पटेल यांच्या भाजपाप्रवेशाचे भव्य कार्यक्रमात रूपांतर करण्याची भाजपची योजना आहे.

हार्दिक यांचा भाजपा प्रवेश पाटीदार राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. हार्दिक पटेल २०१५ मध्ये गुजरातेत झालेल्या पाटीदार आरक्षण आंदोलनाचा मुख्य चेहरा होते. हार्दिक पटेलांच्या काँग्रेस प्रवेशानंतर, पक्षाला पाटीदार समाजाचे समर्थन मिळेल, असे काँग्रेसला वाटत होते. मात्र, २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे चांगली कामगिरी करूनही काँग्रेसला सत्ता मिळाली नाही.

*काँग्रेसला जोरदार झटका*

हार्दिक यांनी भाजपात प्रवेश करणे, हा काँग्रेससाठी निवडणुकीपूर्वीच मोठा झटका मानला जात आहे. काँग्रेस सातत्याने होणारे नेत्यांचे पलायन रोखण्यात अयशस्वी ठरत असल्याचे दिसते. मात्र, हार्दिक पटेल यांच्या प्रवेशासंदर्भात भाजपाकडून अद्याप कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles