‘या’ कारणाने लागू शकतो राष्ट्रवादीच्या दिग्गजांना ‘ब्रेक’

‘या’ कारणाने लागू शकतो राष्ट्रवादीच्या दिग्गजांना ‘ब्रेक’पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

पुणे: महाराष्ट्रात यशस्वी झालेली महाविकास आघाडी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतही होण्याची शक्यता असल्याची चिन्हे आहे. आघाडीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेसही सकारात्मक असल्याचे चिन्ह आहे. प्रत्यक्षात आघाडी झाल्यास राष्ट्रवादीच्या काही दिग्गजांना यंदाच्या निवडणुकीत ‘ब्रेक’ घ्यावा लागेल असेच चित्र सध्या राजकीय वर्तुळात आहे.

आघाडीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या पूर्वीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यांनी अनेकदा जाहीरपणे बोलून दाखविले आहे. शहरात राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. 2017 च्या निवडणुकीत त्यांचे 37 नगरसेवक होते. शिवसेनेचे 9 नगरसेवक पालिकेत होते. तर, काँग्रेसचा एकही नगरसेवक नव्हता.आघाडी झाल्यास सध्याचे नगरसेवक व दुसर्‍या क्रमाकांची मते असलेल्या जागेचा आग्रह राष्ट्रवादीकडून सुरु आहे. ती संख्या 100 च्या पुढे आहे. शिवसेना आपल्या 9 जागेवरील हक्क न सोडता, दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या जागाही मागणार आहे.

महापालिकेच्या 46 प्रभागात 139 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्या ओबीसीसह की, ओबीसीशिवाय होणार याबाबत अजूनही एकमत नाही. तसेच, तारखेबाबतही स्पष्टता नसली तरी, केव्हाही निवडणुका लागू शकतात. प्रभागरचनेसाठी ओबीसीशिवाय आरक्षण सोडत सोमवारी 31 मे रोजी काढण्यात आली. आरक्षणासह प्रभागरचना 13 जूनला अंतिम होणार आहे. त्यानंतर प्रभागनिहाय मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो.

अशा स्थितीत आणि राज्यात आघाडीचे सरकार असल्याने पालिका निवडणुकीतही आघाडी होण्याबाबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेनेचे शहरप्रमुख अ‍ॅड. सचिन भोसले व काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम हे स्थानिक पदाधिकारी सकारात्मक आहेत. त्यांना आघाडी होईल, अशी शाश्वती वाटत आहे; मात्र पक्षाचे वरिष्ठ मंडळी जो निर्णय घेतील त्याप्रमाणे धोरण राबवावे लागेल, असेही ते सांगत आहेत.

मुख्यमंत्री त्यांच्या पक्षाचे असल्याने अधिक जागांवर शिवसेनेने दावा केला आहे. तर, काँग्रेसकडूनही दोन आकडी संख्येचा आग्रह धरला जात आहे. तसेच, समाजवादी पार्टीलाही काही जागांची अपेक्षा आहे. चर्चेच्या गुर्‍हाळानंतर आघाडी झाल्यास प्राबल्य असलेल्या काही जागा राष्ट्रवादीला मित्र पक्षांना सोडाव्या लागतील. त्यामुळे त्या ठिकाणच्या माजी नगरसेवक व पदाधिकार्‍यांना यंदा ब्रेक घ्यावा लागणार आहे. दुसरीकडे, बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बंडखोरी रोखण्यासाठी पक्षश्रेष्ठींना कसरत करावी लागेल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles