भीमराव बाराहाते यांना निवृत्ती समारंभात हृदयस्पर्शी निरोप

भीमराव बाराहाते यांना निवृत्ती समारंभात हृदयस्पर्शी निरोप



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नागपूर कार्यालयातील भीमराव बाराहाते हे कनिष्ठ लिपिक या पदावरुन मंगळवार, दि ३१/०५/२०२२ रोजी (म.न.) नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांचा जन्म ०३ मे १९६४ रोजी उमरेड तालुक्यातील पाचगाव येथे झाला. त्यांना कार्यालयातील कर्मचा-यातर्फे हृदयस्पर्शी निरोप देण्यात आला.

नेतृत्वाला चांगल्या सहका-याची साथ लाभल्यास निश्चीत यश मिळते. असे मनोगत डॉ.मडावी, ग्रंथपाल वर्ग-१ शासकीय विभागीय ग्रंथालय, नागपूर यांनी भीमराव बाराहाते यांच्या निरोप समारंभ अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. दि.०२/१२/१९९५ रोजी शासकीय विभागीय ग्रंथालय, नागपूर येथे शिपाई पदावर रुजू होऊन त्यांची शासकीय सेवेला सुरवात झाली. पुढे बढती होऊन कनिष्ट लिपिक या पदावर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे सेवा दिली. त्यांनी शासकीय नोकरी दरम्यान नागपूर, यवतमाळ, भंडारा, येथे २७ वर्ष ग्रंथालय संचालनालयास प्रदीर्घ सेवा देऊन सेवानिवृत्त झाले आहेत.

आयोजित निरोप समारंभाला डॉ. रमेश जनबंधू, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ, डॉ. सुरज मडावी, ग्रंथपाल वर्ग -१ शासकीय विभागीय ग्रंथालय, नागपूर श्रीमती मिनाक्षी कांबळे, सहाय्यक ग्रंथालय संचालक , नागपूर विभाग, नागपूर ग.मा. कुरवाडे, जिल्हा ग्रंथपाल, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नागपूर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

लिपिक वर्गीय कर्मचारी हा कोणत्याही कार्यालयाचा प्रमुख घटक असतो. भिमराव बाराहाते यांनी कठीण परीस्थितीत परीश्रम घेऊन कौटूंबिक जबाबदा-या सांभाळत शासकीय सेवा दिली आहे. त्यांच्या सेवा काळात ग्रंथालय चळवळीस वाढ होण्यास मोलाची मदत झाली. असे मनोगत डॉ. रमेश जनबंधू यांनी व्यक्त केले. भिमराव डो. बाराहाते, कनिष्ट लिपिक यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. त्यांचे पुढील आयुष्य आनंदी व सुखासमाधानाचे जावो. त्यांना पुढील वाटचालील शुभेच्छा देऊन त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग.मा. कुरवाडे, संचालन कौस्तुभ वाघाडे यांनी तर आभार रितेश जमाईवाल यांनी मानले. कार्यक्रमाला शां.के.लाखे, प्र. वि.रोडे, रामभाऊ खरे, नरेश नागेश्वर, प्रशांत वानखडे, इंगळे, बोरकर, विजय गजभिये. यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाला ग्रंथालय संचालनालयातील सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी, कौटुंबिक नातेवाईक, जिल्हयातील सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रातील कार्यकर्ते, ग्रंथालय कर्मचारी वर्ग, ग्रंथालयाचे सभासद, विद्यार्थी ईत्यादी. मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles