नागपुरात सेवा, सुशासन व गरीब कल्याण पंधरवाडा साजरा होणार

नागपुरात सेवा, सुशासन व गरीब कल्याण पंधरवाडा साजरा होणार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ८ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त नागपुरात ३० मे ते १४ जून या कालावधीत भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अरविंद गजभिये यांच्या नेतृत्वात सर्व सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण पंधरवाडा साजरा केला जाणार आहे. जिल्ह्यातील व २० मंडळांतील सर्व पदाधिकारी सहभागी होणार असून १५ दिवसात पदाधिकारी व कार्यकर्ते ७५ तास जनसंपर्क कार्यक्रमात योगदान देतील. अशी माहिती भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हा यांच्या वतीने आज आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष अरविंद गजभिये यांनी दिली. याप्रसंगी डॉ. राजीव पोतदार, अजय बोढारे, संध्याताई गोतमारे, विशाल भोसले, मल्लिकार्जुन रेड्डी, रमेश मानकर, आनंदराव ठवरे, आदर्श पटले आणि कपील आदमने उपस्थित होते.

नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ८ वर्ष पूर्ण झाली असून त्यांच्या नेतृत्वात समाजातील गरीब, शोषित, वंचित, शेतकरी, महिला आणि तरुणांच्या कल्याणासाठी अनेक कामे झाली आहेत. म्हणूनच निर्णायक, त्यागशील आणि तपस्वी नेतृत्वावर विश्वास ठेवून गरीब, शेतकरी आणि संपूर्ण देश आज पंतप्रधानांच्या पाठीशी उभा आहे. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे सरकार सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणासाठी दृढ निश्चयाने काम करत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते घरोघरी जनसंपर्क करून केंद्र सरकारच्या गरीब कल्याणकारी योजनांची चर्चा करून जनजागृती करणार आहे.

सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण पंधरवड्यात ७५ तासांच्या जनसंपर्क अभियानात प्रत्येक गावात, वॉर्डातून, घरोघरी संपर्क प्रस्थापित करून भाजपचे कार्यकर्ते केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या आठ वर्षातील कामगिरी आणि गरीब कल्याणाच्या विविध योजना, उपलब्धी यांची चर्चा करणार आहेत. भारतीय जनता पक्षातर्फे सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण पंधरवाडा अंतर्गत विविध रॅलीही काढण्यात येणार आहेत.

जनसंपर्क अभियानात किसान चौपाल, महिला संमेलन, एससी-एसटी संमेलन यासह विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. प्रत्येक दिवशी एका विषयावर एक कार्यक्रम आयोजित केला जाईल. शेतकऱ्यांशी संबंधित कार्यक्रमांचे आयोजन करून भाजप किसान मोर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या कार्याची चर्चा करणार आहे. महिला मोर्चाचा कार्यक्रम तयार करून भाजप महिलांमध्ये जाऊन माननीय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली देशात महिला सक्षमीकरणाचे काम कसे झाले आहे याची माहिती देणार आहे.

अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने समाजात जाऊन अनुसूचित जातीशी संबंधित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. मोर्चाचे कार्यकर्त अनुसूचित जातीच्या वसतिगृहात जाऊन विद्यार्थ्यांना भेटतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांचे पंचतीर्थ कसे बांधले ते समजावून सांगतले. गेल्या ७० वर्षात कोणी केले नाही. असे काम झाले आहे. भाजप अनुसूचित जमाती मोर्चाचे कार्यकर्ते अनुसूचित जमाती समाजामध्ये जाऊन त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू, त्या उत्पादनांना MSP अंतर्गत कसे आणले आहे हे सांगतील.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles