
समर्थ विद्यालय लाखनी येथे सायकल रॅलीचे आयोजन
_जागतिक सायकल दिन सप्ताह उत्साहात_
भंडारा: राष्ट्रीय शिक्षण संस्था, द्वारा संचालित समर्थ महाविद्यालय, समर्थ विद्यालय, लाखनी व नेहरू युवा केंद्र, शाखा लाखनी द्वारा ३ जून ते ९ मे जागतिक सायकल दिन सप्ताह निमित्याने सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक अभय भदाडे, प्रमुख अतिथी म्हणून डॉ. चंद्रकांत निंबार्ते, एन.सी.सी कॅप्टन प्रा बा रामटेके व प्रदीप लिचडे, प्रा. लालचंद मेश्राम, अजिंक्य भांडारकर, अक्षय मासुरकर व नेहरू युवा केंद्र प्रतिनिधी सौरभ बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते डॉ. चंद्रकांत निंबार्ते यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सायकल ही आता काळाची गरज आहे. वाढती महागाई आणि इंधन दरवाढ यामुळे सायकल हा योग्य पर्याय आहे. सायकल चालविण्यामुळे शरीराचा व्यायाम होते याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत होईल. तसेच सायकल चालविले तर इंधन बचत होईल आणि त्यातून देश सेवा करता येईल असे ते बोलत होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक अभय भदाडे यांनी सायकल हे पर्यावरण पूरक असून शरीराचा व्यायामासाठी अत्यंत स्वस्त पर्याय आहे असे बोलत त्यांनी सायकल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी समर्थ महाविद्यालय व समर्थ विद्यालय, लाखनी येथील एन. सी.सी. व विदयार्थी उपस्थित होते. लाखनी येथील समर्थ मैदानावरून मुख्याध्यापक अभय भदाडे, प्रमुख अतिथी म्हणून डॉ. चंद्रकांत निंबार्ते, एन.सी.सी कॅप्टन प्रा बा रामटेके व प्रदीप लिचडे, प्रा. लालचंद मेश्राम, अजिंक्य भांडारकर, अक्षय मासुरकर व नेहरू युवा केंद्र प्रतिनिधी सौरभ बोरकर यांनी हिरवी झेंडी दाखवून सायकल रॅली सुरू करण्यात आली. समर्थ मैदान ते गराडा व गराडा टोली असा सायकल प्रवास करीत १० किलोमीटर अंतर पार पाडून रॅली समर्थ महाविद्यालय येथे संपन्न झाली. यात ५० एन. सी एस.सी छात्र व २५ इतर विदयार्थी उपस्थित होते. यात केतकी नंदेश्वर, अंजली भोयर, रुचिरा नंदेश्वर, आदित्य कोरवटे, सलोनी चांदेवार, निर्झश रामटेके, अंजली मोरे, प्रतिक्षा रामटेके, चंदा नेवारे, भारती झंझाड, यश निर्वाण, रितीक टेकाम, गुरुदेव मस्कत, लोकेश गिदमारे, तृजी लोणारे, सुमीता कमाने, डिलेश्वरी रांहगडाले, साक्षी निशाने, नितीन तितीरमारे, अश्वीनी भोयर, अक्षय गभणे या विद्यार्थ्यानी या सायकल रॅली काढण्यात विशेष प्रयत्न केले.