
मुंबई वरून चार वेळा येऊन सुद्धा आर.एल. साठी सादर प्रकरण कुठ पर्यंत आले कळू शकले नाही – सुरेश देशभ्रतार
हिंगणा :- महाराष्ट्रात भ्रष्टाचार बाबत व भोंगळ कारभारा बाबत वानाडोंगरी नगर परिषद चा आर.एल.बाबत भोंगळ कारभार सुरू असून अनेक नागरिकांना नगर परिषद कार्यालयात नाहक हेलपाट्या माराव्या लागत आहे.असाच एक प्रकार दि.०३/०५/२०२२ रोजी नगर परिषद कार्यालयात पहावयास मिळाला.
एक सज्जन गृहस्थ बाहेरून मोठ्या शहरातून प्रवास करून आलेले दिसून आले. बऱ्याच वेळा पासून नगर परिषद मुख्याधिकारी अर्चना मेंढे यांची वाट बघत होते. पण त्यांना कोणी काहीही विशेष माहिती देताना दिसत नव्हते. मी सहजच त्यांच्या जवळ जाऊन विचारले की आपण कोण आणि कोठून आले आणि कशा करीता आले तर त्यांनी सांगितले की मी नागपूरचाच रहिवाशी आहे.
पण आता हल्ली मुंबईला राहतो मी आर.एल.करीता मागील सहा महिन्या पासून प्रकरण दाखल केले आहे.मी आता पर्यंत या एकाच कामा करिता मुंबई वरून चार वेळा आलो पण माझे आर.एल.चे काम पूर्ण झाले नाही आहे. मीअर्ज दाखल केला नंतर मला अद्याप पर्यंत नगर परिषद ने कोणताही पत्र व्यवहार केला नाही. माझ्या प्रकरणात काही त्रुटी असल्यास कळविले नाही आहे व मला डिमांड सुद्धा दिले नाही त्यामुळे मी इथल्या भोंगळ कारभाराने त्रस्त झालो आहेत.
त्यांची ही अवस्था बघून मी कार्यालयात उपस्थित असलेले नगर सेवक नारायण डाखळे ( पाटील ) व गुणवंत ( बाळू ) मोरे यांची भेट घालून दिली त्यांनी या बाबत मुख्याधिकारी अर्चना मेंढे यांच्याशी मोबाईल वर संपर्क साधला. पण त्यांनी आपल्या नेहमीच्या सवयी प्रमाणे मोबाईल उचलणे टाळले त्यामुळे सध्यातरी सुरेशजी देशभ्रतार यांना आल्या पावली सध्या तरी मुंबईला परत जावे लागणार आहे.