दोन महिन्याकरिता इंग्रजी विषयाचे स्पर्धात्मक नि:शुल्क प्रशिक्षण
नागपूर: शहरातील अब्राहम इंग्लिश अँकडमी, मिरा मेडीकल च्या मागे मंगलदीप कॉलनी, इसार पेट्रोल पंपाजवळ बेसा रोड मानेवाडा नागपूर येथील राजू राहुले यांच्या अध्यक्षतेत पत्रपरिषद घेण्यात आली त्यावेळी सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने प्रेरित होऊन आर्थिक, मागासवर्गीय व कमकुवत गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत इंग्रजीचे स्पर्धात्मक ज्ञान व संपूर्ण शिक्षण मोफत शिकवणार आहे असे सांगितले.
समाजाचे काही प्रमाणात ऋण फेडण्याचा प्रयत्न करीत आहोत. मुद्रण साहित्य विनामूल्य देऊन दोन महिन्याचे इंग्रजी विषयाचे स्पर्धात्मक प्रशिक्षण घेतले जात आहेत. म्हणूनच या प्रशिक्षण अकॅडमी चे नाव अब्राहम इंग्लिश अकॅडमी ठेवण्यात आले असेही म्हटले आहे.