ब्रिटनचे पंतप्रधान ‘जॉन्सन’ अविश्वास प्रस्तावा विरोधात विजयी

ब्रिटनचे पंतप्रधान ‘जॉन्सन’ अविश्वास प्रस्तावा विरोधात विजयी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे ‘पार्टीगेट’ प्रकरणी वादात सापडले होते. या प्रकरणी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला होता. मात्र, बोरिस जॉन्सन यांनी त्यांच्याविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावा विरोधात विजय मिळवला आहे. बोरिस जॉन्सन यांना हटवण्यासाठी १८० मतांची गरज होती. मात्र, केवळ १४८ मते मिळवता आल्याने बोरिस जॉन्सन यांनी आपलं पद टिकवून ठेवलं आहे.

बोरिस जॉन्सन यांना २११ मतं मिळाली. तर विरोधक १४८ मतंच जमवू शकले. जून २०२० मध्ये पंतप्रधान निवासस्थान डाऊनिंग स्ट्रीट येथे आयोजित एका वाढदिवसाच्या पार्टीत कोरोना संदर्भातील नियम मोडल्याचा आरोप करण्यात आला होता. ४० हून अधिक खासदारांनी कोरोना काळात देशात लॉकडाऊन असताना पार्टी करून नियम मोडल्याचे विरोधकांनी सांगितले होते. या आरोपावरून जॉन्सन यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती.

सरकारी कार्यालयांमधील पक्षांनी नियमांचं उल्लंघन केल्याचे लक्षात आल्यावर पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि त्यांच्या पत्नी कॅरी यांच्यावर डाऊनिंग स्ट्रीटमध्ये लॉकडाऊन नियमांचं उल्लंघन करुन वाढदिवसाच्या पार्टीचं आयोजन केल्याप्रकरणी दंड आकारण्यात आला होता. सध्याच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नियमांनुसार, बोरिस जॉन्सन यांना या अविश्वास ठरावाविरोधात मिळवलेल्या विजयानंतर किमान १२ महिन्यांपर्यंत अशा प्रकारच्या अविश्वास प्रस्तावाला सामोरं जावं लागणार नाही.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles