मुंबईच्या पोलीस आयुक्तांना लागले ‘निवृत्तीचे वेध’

मुंबईच्या पोलीस आयुक्तांना लागले ‘निवृत्तीचे वेध’



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यानंतर कोण?_

मुंबई: राज्यातील ठाकरे सरकारच्या पोलीस प्रशासनातील कार्यक्षम अधिकारी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या निवृत्तीसाठी आता काहीच दिवस उरले आहेत. मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त कोण असतील याबाबत अद्याप कुठेही चर्चा नसतांना पांडे यांना आता निवृत्तीचे वेध लागले असल्याचे सूत्रांकडून समजते.

मुंबई पोलीस मुख्यालयात असलेले पोलीस आयुक्तांच्या चेंबर्सचे नूतनीकरण करण्यात आले असून सोमवारी हे चेंबर्स आयुक्तासाठी खुले करण्यात आले. पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सोमवारी दुपारी चेंबर्सचे उदघाटन नव्या चेंबर्समध्ये पत्रकारांसह प्रवेश केला.पत्रकारांना न भेटणारे, त्यांच्याशी संवाद न साधणारे संजय पांडे हे सोमवारी पत्रकारांशी मनमोकळे गप्पा मारत होते, माध्यामाच्या प्रतिनिधीनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे शांतपणे उत्तरे देत होते.

एका पत्रकारांने त्यांच्या कामाचे कौतुक केले असता त्यांनी शांतपणे उत्तर दिले की, ‘मी माझ्या कार्यकाळात घेतलेले निर्णय चांगले आहेत. माझ्या नंतर जे नवीन आयुक्त येतील त्यांना जर माझे निर्णय योग्य वाटले तर ते नियम पुढे कायम ठेवतील, त्याच बरोबर संडे स्ट्रीट आणि पोलिसांच्या बाबतीत मी घेतलेले निर्णय देखील योग्य होते. पुढचे आयुक्त त्यावर निर्णय घेतील, असे सांगत पांडे यांनी मुंबई पोलीस आयुक्त पदावरून निवृत्त होण्याची मनाची पूर्णपणे तयारी केली असल्याचे त्यांच्या संवादातून दिसून आले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles