
पंजाबात आता ‘तळीरामांची दररोज दिवाळी’
नवी दिल्ली/हरीयाणा: आम आदमी पक्षाने निवडणुकीच्या आधी टीका केली होती की, गेल्या सरकारला चुकीच्या निर्णयामुळे नुकसानीचा सामना करावा लागला , असा आरोप केला होता. पंजाब सरकार आतापर्यंत दारूचे ठेके हे लिलाव आणि लॉटरीच्या माध्यमातून प्रधान करत होती. मात्र, ही पद्धत पंजाबमधील आप सरकार बंद करणार आहे. पंजाब सरकार लवकरच दारू स्वस्त करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे तळीरामांना मोठा दिलासा मिळणार आहे. पंजाबमध्ये पुढील महिन्यात दारूच्या किमती २० टक्क्यांनी स्वस्त होणार असल्याने, आता पंजाबातील तळीरामांची रोजच ‘दिवाळी’ साजरी होणार आहे.
पंजाब सरकार लवकरच नवीन उत्पादन शुल्क धोरण तयार करत आहे. या धोरणाला आज मंगळवारी होणाऱ्या बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे दारूच्या किमती कमी होणार आहे. त्यामुळे पंजाबमधील दारूचे दर २० टक्क्यांपर्यंत कमी होणार आहे. हे नवीन धोरण चंदीगड, हरियाणा व राजस्थानातून होणाऱ्या दारू तस्करीला रोखण्यासाठी तयार करण्यात येत आहे.
तसेच पंजाब सरकारने तस्करी रोखण्यासाठी विशेष मंडळ देखील या योजनेअंतर्गत तयार करण्यात येत आहे. तसेच पंजाब सरकारचे या निर्णयाच्या माध्यमातून १० हजार कोटी महसूल जमा करण्याचे लक्ष्य आहे. मागील सरकारने ६५०० कोटी महसूल जमा केला होता.
यापुढे आप सरकार ठेके हे टेंडरच्या माध्यमातून देणार आहे. सरकार दारूचा ठेका देण्याआधी त्याची किंमत निर्धारित करणार आहे. त्यानंतर जो अधिक किंमत देईल त्याला टेंडर देण्यात येईल, असा निर्णय घेण्यात येणार आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली असल्याचे समजते.