१८ जून रोजी पत्रकारांसाठी कॅरम स्पर्धा
नागपूर: नागपूर प्रेस क्लब असोसिएशन आणि नागपूर स्पोर्टस जर्नालिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १८ जून २०२२ रोजी, कॅरम स्पर्धेचे आयोजन प्रेस क्लब येथील सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.
दोन दिवसीय चालणाऱ्या कॅरम स्पर्धेत फक्त प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि पोर्टलवर काम करणारे यांच्यासाठी हि कॅरम स्पर्धा आहे. एकेरीसाठी १०० रुपये आणि दुहेरीसाठी २०० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात आले आहे. प्रवेश फार्म प्रेस क्लब आणि पत्रकार भवन येथे उपलब्ध आहेत. असे कळविण्यात आले आहे.