नागपुरात आम आदमी पार्टी अ‍ॅक्शन मोडवर; विदर्भातही पक्ष विस्तार करणार

नागपुरात आम आदमी पार्टी अ‍ॅक्शन मोडवर; विदर्भातही पक्ष विस्तार करणार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_युवा अध्यक्षपदी श्याम बोकाडे तर व्यापारी अध्यक्षपदी विक्की पेटकर यांची नियुक्ती_

नागपूर : महापालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यासाठी आम आदमी पार्टीने चांगलीच कंबर कसून निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. दिल्ली व पंजाब यशानंतर आता उपराजधानी नागपूर जिंकण्यासाठी आम आदमी पार्टी नागपूर ने सुद्धा तयारी सुरू केली आहे.

‘आप’ आता पक्ष विस्तारावर सतत भर देत आहे. कदाचित त्यामुळे ‘आप’ने  नागपूर महापालिकेच्या सर्व जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाने नागपुरात महत्त्वाच्या पदावर नवीन नियुक्त्या केल्या आहेत.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत युवा आघाडीच्या अध्यक्षपदी श्याम बोकडे यांची तर व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी विकी पेटकर  यांची पक्षाने एकमताने नियुक्ती केली आहे.

दि ०८ जून रोजी नागपुरात झालेल्या आढावा बैठकीत नागपूरचे प्रभारी डॉ. देवेंद्र वानखडे, महाराष्ट्र कोषाध्यक्ष जगजीत सिंग, महाराष्ट्र आयटी. सेलचे अध्यक्ष अशोक मिश्रा, नागपूर शहर अध्यक्ष कविता सिंघल, सचिव भूषण ढाकुलकर, उपाध्यक्ष डॉ. जाफरी यांच्या हस्ते नवीन नियुक्ती देण्यात आली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles