‘बार्टी’चा दणदणीत विजय; प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची संख्या वाढावी

‘बार्टी’चा दणदणीत विजय; प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची संख्या वाढावी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: केंद्रीय लोकसेवा नागरी सेवा परीक्षा – ( UPSC) नुकताच रिझल्ट लागला. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे या संस्थेच्या वतीने प्रशिक्षण प्राप्त केलेल्या अनुसूचित जातीतील 7 विद्यार्थ्यांनी युपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.

बार्टी संस्थेच्या वतीने दिल्ली येथील नामांकित प्रशिक्षण केंद्र येथे विद्यार्थ्यांना युपीएससी पूर्व तथा मुख्य परीक्षेचे प्रशिक्षण देण्यात येते. तसेच नागरी सेवा मुख्य परीक्षेसाठी 118 विद्यार्थ्यांना व व्यक्तीमत्व चाचणी परीक्षेच्या तयारीकरीता 23 विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यात आहे.

*युपीएससी नागरी सेवा परीक्षा 2021 मध्ये यशस्वी विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे-*

1) शुभम भैसारे- रॅंक 97
2) स्वप्निल माने- रॅंक 578
3) सुमित रामटेके- रॅंक 358 6. 4)आश्विन गोलपकार- रॅंक 626
5). ओंकार शिंदे- रॅंक 433 7. 6)मानसी सोनवणे- रॅंक 627
7) शुभम नगराळे- रॅंक 568

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सामाजिक (भाप्रसे) व बार्टीचे महासंचालक श्री. धम्मज्योती गजभिये यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आगामी काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, पुणे मार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील उत्तमोत्तम प्रशासकीय अधिकारी घडतील आणि ते महाराष्ट्राच्या, देशाच्या विकासात आपले योगदान देतील अशा अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या.

*यु.पी.एस.सी.*

बार्टीमार्फत अनुसुचित जाती च्या विध्यार्थासाठी 60 विध्यार्थाना प्रशिक्षण दिले जाते, तसेच दिल्ली येथील नामांकित प्रशिक्षण संस्थेत 200 विध्यार्थाना प्रशिक्षण देण्यात येते. युपीएससीच्या मुख्य परिक्षेकरीता प्रति उमेदवार 50 हजार रुपये . व्यक्तीमत्व चाचणी परिक्षेकरीता प्रति उमेदवार 25 हजार आर्थिक सहाय्य केले जाते.

त्याचप्रमाणे MPSC परिक्षा आणि पोलिस आणि मिलीटरी भरती पूर्व प्रशिक्षण बँक ,रेल्वे ,एलआयसी इत्यादी स्पर्धा परिक्षा पूर्व प्रशिक्षण
अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत., सुशिक्षित तरुणांनी बार्टी च्या समतादुत च्या माध्यमातुन किंवा बार्टी आँफिसमधून माहिती घ्यावी. सामाजिक संघटनेनी अशा हुशार विद्यार्थाचा मोठ्या प्रमाणात सत्काराचा कार्यक्रम घ्यावा आणि त्यावेळी तरुणांना मार्गदर्शन ही करतील असे आयोजन करावे असे आवाहन बार्टीने केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles