Home साहित्यगंध सांग कधी कळणार तुला…?

सांग कधी कळणार तुला…?

123

सांग कधी कळणार तुला…?पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_आज जागतिक नेत्रदान दिन_

“जुळता डोळे एका वेळी धीट पापणी झुकली खाली,
खेळ कधी कळणार तुला दोन वेड्या जीवातला,
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला”

ओह…..!!! आलं असेल लक्षात !हा मनातला भाव कुठून, कसा कळतो… एक तर तो बोलल्यावर किंवा त्याहीपेक्षा तो कळतो तो डोळ्यातून. आज 10 जून दृष्टिदान दिन ! दृष्टिदान दिन की नेत्रदान दिन.. की ‘डोळे दान’..”नेत्र भेट दिन.. “अरे वा !
तिमिराकडून तेजाकडे नेणारे हे डोळे एखाद्याला भेट देणं ही संकल्पना आवडली.. कारण दान देणे हीसुद्धा एक उपकृततेची भावना पण भेट देणे म्हणजे कृतज्ञतेची भावना…शिवाय ही भेट द्यायची तर ती आपण आपल्या आयुष्यात डोळ्यांचा पूर्णपणे उपभोग घेतल्यानंतर खरं तर मलाही नेत्र भेट देण्याची, खूप इच्छा आहे.

माझी एक मैत्रीण सीमा की, अंध विद्यालयात मानद अधिकारी म्हणून काम करीत. तिच्या स्कूटरच्या आवाजावरून त्यांचे विद्यार्थी त्या आल्यात म्हणून ओळखायचे. मग विचार करा आपण जर एखाद्याला आपले डोळे दिले आणि आपल्या डोळ्यांनी तो जग पाहत असेल तर.. असीम..आनंद !…

‘असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी’ या सृष्टीचे हे मनमोहक रूप पाहण्यासाठी असलेले हे डोळे म्हणजे आपल्या आयुष्यातलं तेजोमय जग. या जगाला तर हे डोळे पाहतात पण मनातले भाव सुद्धा या डोळ्यांनी बघता येतात. डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे
मनातलं दुःख डोळ्यातूनच तर व्यक्त होतं.. ‘दिल मे तुझे बिठाके कर दूंगी बंद आखे’ म्हणजे बंद डोळ्यातून मन वाचता येतं आणि असे हे डोळे ‘डोळे हे जुलमी गडे’ रोखूनी मज पाहू नका’ असं म्हणतात ना तेव्हा समोरच्याचं अवसानच गळून पडत. पण हेच डोळे
आखो ही आखो मे इशारा हो गया… असं म्हणत जगण्याचा सहारा ही देतात…

ये आखे देखकर हम सारी दुनिया भूल जाते है.| असं म्हणत जग विसरायला ही लावतात.. तर अशीही डोळ्यांवर असलेली गाणी खूप काही सांगून जातात. त्यातून पापण्यांच्या तोरणा खालीअसलेल्या आणि चेहऱ्यावरच्या सर्वांग सुंदर अवयवातील या डोळ्यांची किमया अगदी अप्रतिम आहे. म्हणूनच आपण प्रत्येकाने हा संकल्प करणं गरजेचं आहे. प्रत्येकाने हा निर्धार करावा. कारण या कलियुगात ‘दान’ हा शब्द इतका प्रचलित आणि प्रसारित ही झाला आहे. गेल्या एक-दीड वर्षात तर जास्त प्रमाणात प्रत्येक जण
दानासारखं पवित्र कार्य करीत आला आहे… कारण

‘ दे दान सुटे गिऱ्हांण!’ अस असल्यामुळे काही लोक आता ‘संपत्ती कमी मिळवावी पण दान करण्याचा संकल्प मनी धरावा’ ही वृत्ती बाळगून आहेत… जिथे शक्य होईल, जे शक्य होईल ते दान लोक करू लागले आहेत. ज्ञानदान रक्तदान अन्नदान…. आणि कोणत दान श्रेष्ठ अस जर कोणी म्हणाल, तर ‘या दानाहूनि अन्य दान श्रेष्ठ नसे त्रिभुवनी’ असं असल तरी माझ्या मते प्रत्येक दान हे त्या त वेळेला, प्रसंगी, गरजेनुसार श्रेष्ठ म्हणावं लागेल. पण ‘नेत्रदान’ हे एक वेगळं दान आहे कारण आपण आपल्या मृत्यूनंतर हे जग पाहू शकतो या तेजोमय जगाची विधात्याच्या या अप्रतिम सृष्टीचा आनंद आपण घेऊ शकतो.

अनंताच्या पलीकडे जाऊनही आपलं अस्तित्व उराव
आपल्या डोळ्यातून कुणीतरी जग पहावं
मनाच्या पलीकडे जाऊनही जिवंत रहाव
स्वर्गात गेल्यावर ही आपल्या डोळ्यांनी जग पाहावं. असं आपल्याला वाटत असेल तर चला आपणही संकल्प करू या. ‘मरावे परी नेत्ररुपी उरावे..’ आणि शांता शेळके म्हणतात तसं
‘असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे..’ आपण म्हणू या असेन मी नसेन मी तरी तुझ्या डोळ्यातून जग बघेन मी. माझे डोळे देईन तुला अन जगा भेटेन मी आणि मग

तेरे नैनो के मैं दीप जलाऊंगा
आखो मे दुनिया दिखलाउंगा
असं म्हणत आजचा संकल्प सोडू या…..
आणि मेल्यानंतर ही जग पाहू या….

अनिता व्यवहारे
ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर