
माळी महासंघाच्या युवक आघाडी जिल्हाध्यक्षपदी रोशन बनकर
नागपूर/ हिंगणा: अखिल भारतीय माळी महासंघाच्या नागपूर जिल्हा युवक आघाडीच्या अध्यक्षपदी वानाडोंगरी येथील रोशन बनकर यांची नियुक्ती करण्यात आली. सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक, क्षेत्रात लेखन करत हिंगणा तालुक्यात मागील दहा वर्षापासून निरंतर कार्य शिलतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.
तसेच नागपूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध दैनिकात आपल्या लेखनातून रोशन बनकर कार्य उल्लेखनीय आहे या कामाची दखल घेत अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने अनुसया माता संस्थान पारडसिंगा येथे घेण्यात आलेल्या महासंपर्क अभियान संकल्प सभेत माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाशजी ठाकरे यांच्या हस्ते रोशन बनकर यांना माळी महासंघ नागपूर जिल्हा युवक आघाडीच्या अध्यक्षपदाचे नियुक्त पत्र देण्यात आले.
यावेळी माळी महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस रवींद्र आंबटकर, कोषाध्यक्ष नाना कांडलकर, प्रदेशाध्यक्ष अरुण तिखे, विभागीय अध्यक्ष चंद्रकांत बोरकर, विभागीय कार्याध्यक्ष मुकुंद पोटदुखे, जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण येनकर, प्रमोद हत्ती, नागपूर शहर अध्यक्ष शंकरराव चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष नारायण तीवस्कर, जिल्हा सरचिटणीस निलेश बगाडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रचना कनेर, हिंगणा तालुकाध्यक्ष प्रकाश वानखेडे, महात्मा फुले शिक्षण संस्थेचे संचालक नंदू कनेर, तालुका उपाध्यक्ष अजय निमकर, आदी प्रामुख्याने उपस्थित होते. महासंपर्क अभियान संकल्प सभेला दोन हजार पेक्षा जास्त समाज बांधव उपस्थित होते.