
आघाडी सरकारची बुद्धी घुटण्यात; चंद्रकात पाटील
मुंबई: भाजपच्या वतीने आज दि ११ जून रोजी महाराष्ट्र राज्यसभा निवडणुकीत विजय झालेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. कोल्हापूरच्या पैलवानाने असा डाव टाकला की आघाडीतील नेत्यांना कळालाच नाही. ते आमचा गुडग्यात आहे म्हणत होते, पण आता ते गुडघ्यावर बसले आहेत. आघाडीची बुद्धी घुटण्यात आहे, त्यांनी जरा शिकून घ्यावे, अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.
चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी पाटील म्हणाले की, राज्यसभेच्या निवडणुकीत मिळवलेल्या यशाबद्दल खुद्द शरद पवार यांनीही देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. देवेंद्रजी प्रेमळ आहेत, त्यांनी एक विश्वास तयार केला आहे. ते खरे पैलवान आहेत. त्याच्याकडून राज्यसभेच्या निवडणुकीतून अनेक डाव टाकण्यात आले. ते यांना कधी कळलेच नाही.
*फडणवीस काय म्हणाले ?*
यावेळी फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा हल्लाबोल केला. आमच्याशी बेईमानी करून सत्ता मिळवली. पाठीत खंजीर खुपसून सत्ता स्थापन केली ती नीट चालवून दाखवावे. खरं तर भाजपला विजय मिळाला असल्यामुळे महाविकास आघाडीच्या तोंडच पाणी पळाले आहे, अशी घणाघाती टीका फडणवीस यांनी केली.
दरम्यान, राज्यसभेप्रमाणेच आम्हाला विधान परिषदेसाठीही मतदान होईल. अर्ज माघारीसाठी दोन दिवस उरले आहेत, शहाणे आणि समजूतदार असाल तर आताच अर्ज मागे घ्या आणि निवडणूक बिनविरोध करा, अन्यथा आम्ही लढणारच आहोत आणि जिंकणारही आहोत, असा प्रस्ताव चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.