युवकांनो उद्योजक बनून स्वता: कंपनीचे मालक बना

युवकांनो उद्योजक बनून स्वता: कंपनीचे मालक बना



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_बार्टी महासंचालक धम्मज्योति गजभिये यांचे प्रतिपादन_

रजत डेकाटे
उमरेड / नागपूर प्रतिनिधी

नागपूर/ उमरेड:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आम्बेडकर सांस्कृतिक भवन उमरेड येथे एक दिवसीय उद्योजकता परिचय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक धम्मज्योती गजभिये यांनी युवकांना संबोधित करतांना सांगितले की, युवक युवतींनी उद्योग क्षेत्राकडे आपला कल ओढवून आपली प्रगती साधावी. व आत्मनिर्भर भारत बनवन्यासाठी पुढे यावे. या ही क्षेत्रात आपन चांगली प्रगति साधून इतरांसाठी प्रेरणा बनू शकतो. युवकांनो बेरोजगार राहण्यापेक्षा उद्योजक बनून स्वता:च्या कंपनीचे मालक बना. तसेच बार्टी व समाज कल्याण विभागाच्या योजनांची माहिती देत मार्गदर्शन केले.

सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आम्बेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी उमरेड विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार श्री. राजुभाऊ पारवे तर मुख्य मार्गदर्शक श्री.धम्मज्योती गजभिये महासंचालक बार्टी पुणे, प्रमुख अतिथि श्री. उमेश सोनवाने उपायुक्त तथा समतादूत विभाग प्रमुख बार्टी पुणे, श्रीमती नेमावली माटे उपस्थित होते.

तसेच समाजकल्याण सभापती जिल्हा परिषद नागपूर, श्रीमती सुनीता ठाकरे सदस्या जिल्हा नागपूर परिषद, हेमंत वाघमारे, राज्य समन्वयक तथा केंद्र प्रमुख mced नागपूर, आलोक मिश्रा विभागीय अधिकारी mced विभाग नागपुर, मा. सुरेंद्र पवार उपायुक्त जात पडताळनी समिति नागपूर, श्रीकांत कुलकर्णी प्रकल्प अधिकारी mced नागपूर, समतादूत जिल्हा प्रकल्प अधिकारी हृदय गोडबोले, श्री.एल.कोडापे वरिष्ठ निरीक्षक mced नागपूर, तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. गंगाधर रेवतकर माजी उपाध्यक्ष नगरपरिषद उमरेड, श्रीमती जयश्री देशमुख पं.स.सदस्या उमरेड, प्रियंका लोखंडे पं.स.सदस्या उमरेड, जितेंद्र गिरडकर अध्यक्ष संजय गांधी योजना, श्रीमती सुरेखा गजघाटे सरपंच गोधनी, रामूजी गजघाटे सामाजिक कार्यकर्ता, महिला उद्योजिका ज्योती तायड़े विशाल देशमुख माजी नगरसेवक उमरेड यांनी स्थान भूषविले.

उमरेड विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार राजुभाऊ पारवे यांनी सांगितले की, युवक युवातींना उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. Barti व mced महाराष्ट्र मध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकांसाठी फार चांगले कार्य करित आहे याचा मला आंनद आहे.याचा लाभ माझ्या मतदार संघातिल लोकांनी घ्यावा या करिता मि कटिबद्ध आहे. युकांनी बेरोजगार न राहता पुढे येवून उद्योग करावा व समाजात चांगला मानुस बनुनून जगावे. आणि उद्योग क्षेत्रात पुढे जावे. त्या साठी आपणास मार्गदर्शन व मदत करण्यास शासनाची सर्व यंत्रणा तयार आहे.फक्त युवकांनी या क्षेत्रात मनाची पूर्ण तयारी करुण उतरावे. असे मत प्रतिपादन केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतुन एम.सी.ई. डी. हिंगणा केंद्र प्रमुख/प्रकल्प अधिकारी तथा राज्य समन्यवक श्री. हेमंत वाघमारे यांनी एक दिवसीय उद्योजक परिचय प्रशिक्षण कार्यशाळेच्या माध्यमातून १८ ते ४५ वयोगटातील युवक युवतींना उद्योजकता विकास म्हणजे काय?व्यवसायासाठी त्याची काय आवश्यकता आणि उद्योग सुरु करण्यासाठी व्यक्तिची मानसिकता, बँक व्यवहार, बाजारपेठ, उत्पादन व वस्तुची विक्री, या सर्व विषयावर तसेच युवकांची मुलाखत घेऊन 28 दिवसाचे निःशुल्क अनिवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम देऊन उद्योग स्थापन करून विकसित करण्यासाठी सहकार्य केले जाईल. असे सविस्तर उपस्थित युवक युवातींना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमा करीता समतादूत सतीश सोमकुंवर, अल्ताफ कुरेशी,स्वाती हांडे, पवन रामटेके, राजेश राठोड, दुर्योधन बगमारे, ओमप्रकाश डोले, मोहन पांडे, मोईन शेख, मंजूषा मडके, प्रार्थना दिवे, शारदा माकोडे, दीप्ति मानकर, अमोल खवसे, सुनिता गेडाम, समन्वयक मोरेश्वर सोमकुंवर यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समतादूत सतीश सोमकुंवर यांनी केले. तर आभार विभागीय अधिकारी mced नागपूर आलोक मिश्रा यांनी मानले. केले. कार्यक्रमाला उमरेड, कुही, भिवापुर तालुक्यातील युवा गटातील युवक – युवती, महिला तसेच नागरिक उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles