
साकोली नगरीत खा. प्रफुल्ल पटेल यांचे जंगी स्वागत
भंडारा/साकोली : राज्यात दि १० जून रोजी झालेल्या राज्यसभेच्या सहा जांगासाठीच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांची खासदार म्हणून निवड झाली. खासदार झाल्यानंतर ते पहिल्यांदाच भंडारा जिल्ह्यात आले असता, तालुका साकोली येथे त्यांचा जंगी स्वागत करण्यात आले.
जिल्ह्यातील बिडीसीसी बँकेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते सुनिलभाऊ फुंडे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीचे नेते, मार्गदर्शक खा. प्रफुल्लभाई पटेल यांची पुनश्च एकदा राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल साकोली येथे सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नानाभाऊ पंचबुद्धे, जि. प. सदस्य अविनाश ब्राह्मणकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. विविध संस्था, संघटना यांच्या वतीने देखील आदरणीय प्रफुल्ल पटेल यांचा स्वागत सत्कार करण्यात आला.