बेंगळुरूच्या राष्ट्रीय लष्करी विद्यालयाचा अमृत महोत्सवी कार्यक्रम संपन्न

बेंगळुरूच्या राष्ट्रीय लष्करी विद्यालयाचा अमृत महोत्सवी कार्यक्रम संपन्न



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नवी दिल्ली: बंगळूरु येथील राष्ट्रीय लष्करी विद्यालयाच्या अमृत महोत्सवानिमित्त दि १३ जून रोजी आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले, की विद्यार्थी, शिक्षक तसेच माजी विद्यार्थ्यांसह संपूर्ण कर्मचारी वृंदाचे अमृत महोत्सवानिमित्त अभिनंदन केरतो. स्थापनेपासूनच उज्ज्वल कामगिरी करत देशातले सर्वोत्तम निवासी विद्यालय म्हणून या विद्यालयाने नाव लौकीक मिळवला आहे. देशातल्या 23 राज्यांमधले विद्यार्थी या विद्यालयात शिक्षण घेत असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

या विद्यालयात शिक्षण घेत असलेले जम्मू काश्मीरपासून केरळपर्यंतचे विद्यार्थी हे देशाच्या विविधतेतून एकतेचे प्रतिक आहेत. या प्रकारे एकमेकांच्या सहवासामुळे हे विद्यार्थी आपल्या सहाध्यायांच्या भाषा, संस्कृती आणि परंपरांशी नक्कीच परिचित झाले असतील असे राष्ट्रपती म्हणाले. या शैक्षणिक वर्षापासून देशभरातल्या सर्व राष्ट्रीय लष्करी विद्यालयात मुलींनाही प्रवेश दिला जाणार आहे याबद्दल राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. देशाच्या कन्या वेगवेगळ्या क्षेत्रात नव नवे विक्रम स्थापन करत असून देशाला त्यांचा सार्थ अभिमान आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपतींनी काढले.

या प्रतिष्ठित विद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुली देश संरक्षणात आणि राष्ट्र उभारणीत आपले उत्कृष्ट योगदान देतील असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला. ‘शीलं परम भूषणं’ अर्थात चरित्र्य हाच सद्गुण हे ब्रीदवाक्य विद्यार्थ्यांना सदैव मार्गदर्शक ठरेल, हे विद्यालय विद्यार्थ्यांना समग्र शिक्षणासह शिस्त, लष्करी नीतिशास्त्र याचे ज्ञान देण्याचे पवित्र कार्य निरंतर करत राहील असा विश्वासही याप्रसंगी राष्ट्रपतींनी व्यक्त केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles