मोदी विरोधात आक्षेपार्ह टिपणी भोवली; हुसेन यांच्यावर गुन्हा दाखल

मोदी विरोधात आक्षेपार्ह टिपणी भोवली; हुसेन यांच्यावर गुन्हा दाखल



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_अडचणीत अधिक वाढ होण्याची शक्यता_

नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषेत टिपणी केल्याप्रकरणी नागपुरात काँग्रेस नेते शेख हुसेन यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला असून त्यांच्याविरोधात कलम २९४ (अश्लिल कृत्य आणि गाणी) तसंच ५०४ (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमानजनक टिप्पणी करणे) या कलमांतर्गत गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

शेख हुसेन हे नागपूर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ईडीकडून नॅशनल हेराल्डशी संबंधित प्रकरणात चौकशी सुरू आहे. त्यांच्या होत असलेल्या चौकशीवरुन सध्या काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून काही ठिकाणी कार्यकर्त्यांची आंदोलनं सुरू आहेत. या आंदोलनात सहभागी झालेले असताना शेख हुसेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह शब्दांत टिप्पणी केली. त्यामुळे नागपूर भाजपाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे शेख हुसेन यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर नॅशनल हेराल्ड गैरव्यवहार प्रकरणात ईडी कारवाई करण्यात आली आहे. १८ तासहून अधिक चौकशीनंतर आज सलग तिसऱ्या दिवशी राहुल गांधींची चौकशी सुरू आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles