सेंट्रल रेल्वे मजदूर संघातर्फे नारायण बागडेंचा सत्कार
नागपूर/ मुंबई: जेव्हा सामान्य कार्यकर्ता हा चळवळीचे नेतृत्व करतो तेव्हा फुले शाहू आंबेडकरांचे विचार खऱ्या अर्थाने जिवंत राहतात त्याचेच हे उदाहरण आहे. आम्ही नेत्यांच्या नाही एका प्रामाणिक भल्या माणसाच्या सत्कार करित आहेत असे प्रतिपादन सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे अध्यक्ष भाई अमिर खान यांनी केले आज संघाच्या वतीने कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे बागडे सरांच्या सत्कारा प्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छाया शेवाळे हे होते भाई अमिर खान यांच्या हस्ते आंविमो चे प्रदेश सरचिटणीस सुखदेव दांडगे प्रा रमेश दुपारे आनंदराव गोरे यांच्या सत्कार करण्यात आला मोठ्या संख्येने रेल्वे मजदूर संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.