वानाडोंगरी नगर परिषद मुख्याधिकारी व कर निरीक्षक यांच्यावर कारवाईची मागणी

वानाडोंगरी नगर परिषद मुख्याधिकारी व कर निरीक्षक यांच्यावर कारवाईची मागणी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_नगर परिषद कार्यालयातून मालमत्ता क्र.४१५९ चे दस्तावेज गहाळ_

गजानन ढाकुलकर, प्रतिनिधी
हिंगणा/नागपूर

नागपूर: हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी नगर परिषद अंतर्गत असलेल्या प्रभाग क्र.१० मधील रहिवाशी श्रीमती सरोज राजेश मोवळे यांचे पती स्व.राजेश वसंत मोवळे यांचा दि.२ जनवरी २०११ रोजी मृत्यू झाला असून त्यांचे सासरे स्व.वसंतराव गोविंदराव मोवळे यांचा मृत्यू दि. २ मार्च २०२१ ला झाला आहे. त्यांच्या नावे असलेले वानाडोंगरी प्रभाग क्र.१० नगर परिषद कार्यालयातील नोंद मालमत्ता क्र.४१५९ असून सदर मालमत्ता त्यांच्या सासऱ्याच्या नावे नोंदणीकृत दस्ताच्या आधारे मालमत्ता तत्कालीन ग्रामपंचायत मध्ये १५ वर्षापूर्वी नोंद केले असून त्या दस्ताच्या छायांकित प्रतची आवश्यकता असल्यामुळे याबाबत अर्ज दाखल केला व दस्तांची मागणी केली असता नगर परिषद कार्यालयात दस्त उपलब्ध नसल्याची माहिती दिली.

मालमत्तेचे दस्त संभाळणीची जबाबदारी यांची असताना जर दस्त चोरीला गेले असेल तर यांचे प्रथम कार्य पोलीस ठाण्यात तक्रार करणे आहे. यामुळे या मालमत्तेचे दस्त यांनीच गहाळ किंवा चोरी केले असावे तरी मला या मालमत्तेचे दस्त आपण कारवाई करून उपलब्ध द्यावे अशी मागणी सरोज मोवळे यांनी केली आहे.

वानाडोंगरी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना मेंढे व कर निरीक्षक यांचेवर कायदेशीतर कारवाई करण्यात यावी आशा आशयाची तक्रार एमआयडीसी पोलीस स्टेशन नागपूर ( शहर) येथे सरोज मोवळे यांनी दाखल केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles