तब्बल २२ वर्षानंतर एकत्र आलेल्या शिक्षक व विद्यार्थ्यांचे ‘गेट टुगेदर’

तब्बल २२ वर्षानंतर एकत्र आलेल्या शिक्षक व विद्यार्थ्यांचे ‘गेट टुगेदर’



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नंददत डेकाटे
हिंगणा / नागपूर

नागपूर: शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. या गप्पांच्या ओघात सर्वजण आपण इतके मोठे झालो हे विसरून गेले होते. निमित्त होते हिंगणा तालुक्यातील गुमगाव येथील यशवंत हायस्कूल, कन्या शाळा आणि बेसिक शाळा येथील वर्ष १९९१ ते वर्ष २००० दरम्यानच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या ‘गेट टुगेदर’ अर्थात स्नेह मिलन सोहळ्याचे!

वयाची पस्तीशी ओलांडलेल्या या विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रात करिअर करून यश मिळवले. या स्नेह मेळाव्यात जुन्या आठवणींना तर उजाळा दिलाच, शिवाय सद्यपरिस्थितीवर या बालमित्रांनी दिलखुलास गप्पा मारल्या. वर्गाच्या चार भिंतीत बसून गप्पा मारलेल्या मित्रांनी आजचा दिवस पुन्हा बालपणासारखा जगून नवी उमेद घेतली. सर्व माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर सर्वांनी आपला परिचय दिल्यावर शाळेतील काही गंमतीदार आणि काही चांगल्या आठवणींना उजाळा दिला.

आऊटर रिंग रोडवरील रसरंजन रेस्टॉरंट येथे पार पडलेल्या या सोहळ्याला यशवंत हायस्कूलचे मुख्याध्यापक अशोक ढोमने, माजी मुख्याध्यापक फिरोज कुरेशी, शिक्षक विश्वजित बोंदाटे,बब्बू पठाण,गणपत तळणकर,सुलभा जाधव,श्यामराव वसाके, खुर्शीदा पठाण,लतीफा कुरेशी, दामोदर घोडे, श्री.अवचट, श्री.तुरक,खेमराज मुटे,निर्मला मुटे,श्री.लाड, सिद्धार्थ सातकर, श्याम बोबडे, माहुरे,सौ.पठाण,श्रीमती काळे यांच्यासह मंगेश वाडबुधे,निलेश कडवे,संजय घटे,सागर ढवळे,लीलाधर दुर्गे,भागवत आष्टनकर,रवींद्र कुंभारे,सोनू झाडे,निशा शोभणे, विभा भोंडगे,शुभांगी घोडे,भारती वसाके,सुचिता ढोले,उमेश आष्टनकर,संजय भानुसे,कवडू इखार,प्रशांत चौधरी,भोजराज पिसे,घनश्याम शेंडे,संगीता मोहूर्ले,गणेश दुर्गे,सुनील वानखेडे,दीपक साठवणे,कुंदा हुलके,मनोहर मुटे,दिनेश वानखेडे,अमर टापरे,नंदकिशोर बेलखोडे, भारती सोरते,संगीता पाटील,जावेद पठाण,विष्णू तुमाने,अनिल बावणे,प्रशांत आंबिलडुके,विजय चिंचुलकर,प्रकाश ढगे, उमेश सोनकुसळे, राजेश सेलवंटे,रमेश ढवळे, परमेश्वर नरड,जितेंद्र डफ,चंदू गिरसावरे,सीमा सावरकर,अमित निवंत,नरेंद्र मेहुणे,छडीराम मुटे,सुरेंद्र सोनूले,गणेश बेलखोडे, मंगेश निवंत, टोमेश्वर गहरुले,चंद्रशेखर कामडी आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.

तब्बल २२ वर्षानंतर गुरुजन आणि विद्यार्थ्यांची भेट झाली. या भेटीत विचारपूस, खुशाली, सोबत सुख दु:खाच्या गुजगोष्टी झाल्या. मिष्टान्न जेवणाचा आनंद घेऊन पाणावल्या डोळ्यांनी निरोप घेत सर्वांनी परतीचा निरोप घेतला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles