
बौध्दांना टार्गेट कराल तर याद राखा?
_तुमचा हा अन्याय, अत्याचार आम्ही कदापि सहन करणार नाही : एआयपीएस भारत_
सतीश भालेराव, नागपूर
यवतमाळ :- ऑल इंडिया पॅथर सेना भारतीय स्तरावर प्रखरतेने दिन, दुबळे, दलितांच्या, पीडितांचे, शोषितांच्या प्रश्न धरुन प्रशासनाला जाग करण्याचं प्रामाणिकपणे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाई केदार यांच्या मार्गदर्शनाखाली अन्यायाविरोधात काम करत, दलितांच्या पीडीतांचे शोषितांच्या प्रश्न शासन दरबारी निवेदन देऊन दाद मागत आहे.ऑल इंडिया पॅथर सेनेचा या प्रकरणी प्रशासनास इशारा देत जशास-तसे प्रत्युत्तर देण्याची भुमिका आमची पण आहे. याद राखा आम्ही शांत आहोत म्हणून आम्ही तुमचा अन्याय सहन करणार नाही. हातात दांडू घेत तुम्हाला कोलंदांडे करायला वेळ लागणार नाही. जणांवरासारखी दैनां केली आहे बौध्दांची तुम्ही. जोपर्यत आम्ही पेटून उठणार नाही तोपर्यत हिच दुर्दैशा होणार.
यवतमाळ जिल्हातील गळव्हा या गावातील मानवतेला काळिमा फासेल एवढं भंयान निच वृत्तीचे भाजप सरकार बौध्दांवर खुलेआम पुरूष, महिलावर अन्याय अत्याचार करीत आहेत आज महापुरुषांची विंटबना गळव्हा या गावात केली जाते. निळा झेंडा काढून त्या झेंड्यांची विंटबना करत, काढलेल्या झेंडयाची विंटबना करत मनुवादयांनी गावात जल्लोष केला. गावातील बौध्दांना बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न तिथे केला जात आहे, गावात पिण्यासाठी पाणी दिलं जात नाही. सिजर झालेल्या बौध्द महिलांचा अवमान करीत प्रशासनाने महिलांवर एका पध्दतीचा छळ गेल्या चार दिवसापासून हा प्रकार सुरू आहे.
यवतमाळ जिल्हातील लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावरुन हे सुनियोजित कट केलं जात आहे. बौध्द, फुले, शाहु, आंबेडकराच्या, महाराष्ट्रात शांतता भंग करण्याचं षडयंत्र सुरु आहेत. सुनियोजित कट करीत या महाराष्ट्रात दंगली पेटविण्याचं काम भाजप सरकार करीत आहे. यवतमाळ जिल्हातील गळव्हा या गावात अजुनही प्रशासकीय, जिल्हाधिकारी, तहसलीदार, पोलीस आधक्षीक, आमदार, खासदार, मंत्री यांनी अजुनही गव्हाळा या गावातील बौध्दांना भेट दिली नाही. गावात गुंडगिरी करणाऱ्या गावगुंडांना अजुनही ताब्यात घेतलं जात नाही.
या प्रकरणामध्ये बौध्दाना विचारपूस केलेली नाही. बौध्दांना टार्गेट करण्याचे हे सुनियोजित षंडयंत्र भाजप सरकारचे आम्हाला दिसून येत आहे. महाराष्ट्रात शांतता हवी आसेल तर तात्काळ बौध्द पिडितांची भेट घेवुन जो कोणी सरपंच व इतर आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करण्यात यावे. गव्हाळा या गावातील ग्रामपंचायत तात्काळ बरखास्त करण्यात यावी. ज्या बौध्द महिलांचा अमानिवी पध्दतीने छळ करणाऱ्या पोलीस प्रशासनाला निंलबीत करण्यात यावे.
आंबेडकरी समाजामध्ये संतापाची लाट पसरली आहे तात्काळ ठोस भूमिका घ्यावी. अन्यथा ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने महाराष्ट्रात जातीवादी, मनुवादयाची वरात काढण्यात येईल आणि उद्या महाराष्ट्रात जर उद्रेक झाला तर याला जबाबदार यवतमाळचे आमदार, खासदार, मंत्री, पोलीस प्रशासन असेल यांची नोंद पोलीस प्रशासनांनी घ्यावी. असा सवाल कुणाल भैय्या इंगळे जिल्हाध्यक्ष, ऑल इंडिया पँथर सेना यांनी केला आहे.