बिरसा फायटर्सच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी सुरेशकुमार पंधरे यांची निवड
✍️सतीश भालेराव नागपूर
नागपूर : बिरसा फायटर्सच्या वतीने नुकत्याच झालेल्या “व्हिसी” सभेमध्ये बिरसा फायटर्सची स्थापना दिनाचे औचित्य साधून संघटनेच्या मजबुतीसाठी व संविधानिक दर्जा उंचावणारे, विचारवंत, निसर्ग लेखक समाज सेवक आदिवासी उलगुलानाचे कणखर नेतॄत्ववान, कर्तव्यनिष्ठ कामदार, लेखनीचे शब्दरूपी धारदार पत्रकार व सरपंच परिषद मुंबई “राष्ट्रपती पुरस्कृत सरपंच” व समन्वयक सुरेशकुमार पंधरे यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी सर्वानुमते निवड केली.
यावेळी सभेत राज्याध्यक्ष मनोज पावरा, राजेशदादा धुर्वे, उपाध्यक्ष, दादाजी बागुल महानिरिक्षक, राजेंद्रजी पाडवी महासचिव, गणेशजी खर्डे प्रसिध्दी प्रमुख, सतिश जाधव भरत पावरा, जालिंदर पावरा, एकनाथ लाखोळे, बळीरामजी कोठवार राहुल रावताळे, के.आर. पाडवी, विलास पावरा, नाशिक विभाग, राजाभाऊ सरनोबत कोकण विभाग, विजय शहारे, हसन रुबाब तडवी, राकेशजी सोयाम, शामरावजी उईके, संजय ठाकुर, मुंबई वसंत पावरा, क्रिष्णाजी भंडारी, पी.बी. कंगाले, भोजराज उईके, व्हि.एस. खंडाते, विनोद कंगाले, कविता उईके, राज्यविदर्भ पदाधिकारी हजर होते.
सोशल मिडीयावर त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे, तसेच शुभेच्छा वर्षाव होत आहे. जिल्हाध्यक्षांचे बिरसा फायटर्सचे नवनियुक्त राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेशकुमार पंधरे यांनी सर्वाचे आभार मानले आहे.