
भाजपाने फसवणुकीने सर्व आमदारांना कैद करून ठेवले; संजय राऊत
_एकनाथ शिंदे कट्टर शिवसैनिक ते नक्कीच परततील_
मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे हे नाराज नाहीत, ते आमचे जीवाभावाचे कडवट व कट्टर शिवसैनिक आहेत. मुंबई वर ताबा मिळण्यासाठी आणि महाराष्ट्र अस्थिर करण्याचा भाजपाचा डाव असून महाराष्ट्रात कोणताही राजकीय भुकंप होणार नाही असा दावा शिवसेना नेता खा. संजय राऊत यांनी नुकताच केला.
आमचा कित्येक आमदारांशी संपर्क झाला असून काही गैरसमजातून आणि दिशाभूल करुन गुजरात मधील सुरत मध्ये काही आमदारांना घेऊन गेले असल्याची माहिती आहे. आणि ते नक्कीच परतणार असेही राऊत म्हणाले. फसवणूक करुन त्यांना सुरत मधील हॉटेलमध्ये ठेवले असल्याची माहिती राऊत यांनी दिली.
महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा हा भाजपाचा डाव आहे. मुख्यमंत्र्यांबाबत गैरसमज असल्यास ते दूर केले जाईल भाजपाचा हा छातीवर घाव नसेन पाठीवर आहे. महाराष्ट्र राज्यात मध्यप्रदेश पॅटर्न राबविण्याचे भाजप चे षड्यंत्र असल्याचे संजय राऊत म्हणाले. कित्येक आमदारांना महाराष्ट्रात परतायचे आहे परंतु त्यांना इथे भाजपाच्या नेत्यांकडून कैद केले असून 7 लेव्हल सुरक्षा सुरतमधील हॉटेलबाहेर वाढवली आहे. असाही आरोप खा. संजय राऊत आज यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे.