मी शिवसेनेतच राहणार फक्त कॉंग्रेस राष्ट्रवादीशी नाती तोडा; एकनाथ शिंदे

मी शिवसेनेतच राहणार फक्त कॉंग्रेस राष्ट्रवादीशी नाती तोडा; एकनाथ शिंदे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_सूरतहून उद्धव ठाकरेच्या प्रस्तावास शिंदेचे उत्तर_

सुरत (गुजरात) : शिवसेना नेते व मंत्री एकनाथ शिंदे हे गुजरात मधील सुरत येथे 35 आमदारांसह वास्तव्यास आहेत. दलबदल कायद्यांतर्गत टाळण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी जवळपास शिवसेना चे 2/3 आमदार तोडल्याने शिवसेना सोबतच महाविकास आघाडी सरकारमध्ये अस्वस्थता पसरली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांनी सेना प्रमुख उद्धव ठाकरे कडे निरोप पाठवला आहे कि, कांग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबतची युती तोडा मी व समर्थक आमदार शिवसेनेसोबत राहणार.

आपण भाजप सोबत पुन्हा एकदा सत्ता स्थापन करा आम्ही सेना सोडत नाही.. 2/3 आमदार एकनाथ शिंदे सोबत असल्याने मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. शिवसेना पक्षात मोठी फुट टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढे पेच निर्माण झाला आहे. त्यांना राजीनामा देण्याशिवाय पर्याय नाही आणि ते सरकार बरखास्त करुन राज्यपाल यांना आपला राजीनामा पाठवतील आणि नव्याने निवडणुक घेण्याची शिफारस करतील. कारण सध्या एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांना आव्हान ठरत आहेत. आणि त्यांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरे कोणत्याही परिस्थितीत भाजपा सोबत जाण्याची शक्यता दिसत नाही.

*देवेंद्र फडणवीस पोहोचले दिल्लीतील जे पी नड्डांच्या घरी*

नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीतील भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डांच्या घरी पोहोचले आहेत त्याचबरोबर गृहमंत्री अमित शाह सुद्धा पोहोचले महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात हालचालीला वेग आला असून फडणवीस मुख्यमंत्री तर शिंदे उपमुख्यमंत्री होतील अशा प्रकारे नवीन सरकार स्थापनेवर चर्चा होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles