
हिंगणा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
गजानन ढाकुलकर, नागपूर
हिंगणा :- पंचायत समिती सभागृहात आंतरराष्ट्रीय योग दिन दि.२१ जून रोजी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, मा. रुपालीताई खाडे, सभापती पं.स.हिंगणा, प्रमुख अतिथी बाळासाहेब यावले, गट विकास अधिकारी पं.स.हिंगणा, मा.डॉ. प्रविण पडवे, तालुका आरोग्य अधिकारी हिंगणा, तसेच पं.स.कार्यालयीन विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिप प्रज्वलन करुन योग दिन सत्राची सुरवात करण्यात आली. त्यानंतर योगासनाचे महत्व, बाँडी वार्म अप, ताडासन, वृक्षासन, पद्मासन, सुर्य नमस्कार तसेच शेवटी अनुलोम विलोम, कपालभाती, भ्रामरी तसेच ओमकार चा जप ई. आसनाचा योगाभ्यास करण्यात आला. योग गुरु श्री. दत्ताजी गायकवाड सर तसेच श्री. चंद्रकांत वरले गुरुजी यांनी उपस्थित सर्वांकडून योगाभ्यास करुन घेतला. व विस्तृत मार्गदर्शन केले.
योग सत्र यशस्वी करण्यासाठी श्री.नरेश ईटनकर, स.प्र.अ.श्री. धनालकोटवाल सर, के.प्र. यांनी परिश्रम घेतले. तसेच रायपूर येथील फुलामाता मंदिर मध्ये महाराष्ट्र कल्याण मंडळा तर्फे सुद्धा योगदिन साजरा केला. चंद्रकांत वरले गुरुजी यांनी योगदिनाची माहिती दिली. याप्रसंगी सचिन रोडगे ,गजेंद्र दरक , सतीश कडू , दत्तात्रय अडयालकर , सतीश घिमे , सौ.दिपाली घिमे , सुरेश आंबटकर , पाटमासे आदींनी परीश्रम घेतले.