जिल्हा परिषद शाळा खातखेडा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

जिल्हा परिषद शाळा खातखेडा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

रजत डेकाटे /नागपूर प्रतिनिधी
भिवापूर (नागपूर)

नागपूर: भिवापूर पंचायत समिती अंतर्गत असलेल्या खातखेडा येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला
या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरनीय श्रीमान संदिपजी थेरे यांच्या अध्यक्षतेखाली योगादिनाला सुरुवात झाली.विविध प्रकारचे योग करुन दाखवून विद्यार्थ्यांना तसेच गावातील पालक ,प्रतिष्ठित नागरिक,शाळेतील शिक्षक, शिक्षीका व शाळेतील संपूर्ण विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे महत्त्व आयु.राजु नवनागे सर (स.अ) योगशास्त्र ही भारतीयांची जगाला दिलेली देणगी आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह, स्थूलता, थाँयराईड व्रुध्दी,मनोविकार, सांध्यांचे विकार तसेच सध्याच्या जीवनशैलीमुळे निर्माण झालेले अनेक आजार, योग करण्यामुळे कमी होऊशकतात. योगाच्या दैनंदिन आचरणामुळे निरोगी राहण्यास व रोग मुक्त होण्यासाठी मदत होते. तसेच सकारात्मक उर्जाही मिळते.स्वस्थ जीवन जगन हे जीवनाचे भांडवल आहे.अशाप्रकारे मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संध्याताई चंद्रकांत शेगोकर मँडम यांनीही उपस्थितीतांना दररोज नियमित योगा करण्याची विनंती केली.या कार्यक्रमाला उपस्थित सौ.सुमनताई विनायकजी गायकवाड(अं.से),श्री.सुभाषजी मसराम,श्री.अमोल थेरे,आयु.सुमित डांगे,आयु.निखिल तिर्थराज मुन(स्वयंसेवक),सौ.मंदाताई सुधीर मसराम(शा.व्य.स.) आणि शाळेतील संपूर्ण विद्यार्थी यांनी सहभाग घेतला. अशाप्रकारे आंतरराष्ट्रीय योगादिन संपन्न झाला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles