
१२८ वा ऑलिम्पिक दिवस सोहळा आज
सतीश भालेराव, नागपूर
नागपूर: महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन तर्फे आनंदनगर स्पोर्टस असोसिएशनच्या मैदानावर २३ जून २०२२ रोजी सकाळी ९.३० वाजता १२८ वा ऑलिम्पिक दिवस क्रीडा व युवा विभाग तसेच एकविध खेळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात येणार आहे.
या सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे क्रीडामंत्री नामदार सुनील बाबू केदार यांचे हस्ते तर अध्यक्ष म्हणून भारतीय व्हॉलीबॉल महासंघाचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष विजय डांगरे राहणार असून विभागीय क्रीडा उपसंचालक शेखर पाटील प्रमुख पाहुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, प्रमूख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहे. त्याच प्रमाणे नागपूरमधील विविध संघटनेचे आंतरराष्ट्रीय खेळाडू द्रोणाचार्य अवॉर्ड प्राप्त मान्यवर, अर्जुन पुरस्कार यांचे प्रातिनिधीक स्वरूपामध्ये त्यांचा गौरव करण्याचे निश्चित केले आहे विशेष सत्कार चार वर्षे पाच महिन्याची कुमारी आर्या टाकोणे हिचा विशेष सत्कार करण्याचे आयोजन समितीने निश्चित केलेले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात रॅली पासून सुरू होणार असून त्यानंतर खेळाडूंचे व मान्यवरांचे सत्कार सोहळा आणि मान्यवरांचे ऑलम्पिक दिवस संदर्भात मनोगत तसेच परिसंवाद या प्रकारे कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे. असे स्पर्धा आयोजन समितीचे अरविंद गवई यांनी कळविले आहे.