
‘त्या’ बलात्कारी नराधमास फाशी झालीच पाहिजे; ऑल इंडिया पँथर सेना
_15 दिवसापासून दडपलेल्या बलात्कार प्रकरणास फोडली वाचा_
_आरोपीच्या घरासमोर ऑल इंडिया पँथर सेनेने फोडली डरकाळी_
सूरज भिलकर, प्रतिनिधी
नागपूर: जिल्हयातील गुन्हेगारीचे प्रमाण वरचेवर वाढत असतांना हिंगणा तालुक्यातील मातोश्री नगर वानाडोंगरी येथील १५ दिवसापूर्वी घडलेल्या ५० वर्षीय नराधमाने १० वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याच्या घटनेला ऑल इंडिया पँथर सेनेचे विदर्भ उपाध्यक्ष विशाल गेडाम यांनी प्रकाशझोतात आणले. आज दिनांक २२ जून रोजी हिंगणा तहसिल कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करून तहसिलदार यांना नराधमास फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी १५० महिला पुरुष पिडीताचे कुटुंब उपस्थित होते.
सविस्तर वृत्त असे की, पंधरा दिलसापूर्वी सायंकाळी 6:30 7:00 च्या दरम्यान पिढीत मुलगी हिचा मामा विक्की भजभुजे आरोपी प्रदीप चौधरीच्या घरी किरायानी राहत होता. घरी पाहुणे आले म्हणून जेवणाचे आमंत्रण बहिनीला दिले. मुलीचा वडील कामावर गेला होता आणि तिथून अंदाजे 500 मीटर असलेलं मामाच घर आहे म्हणून मुलीला पाठविले. मामाच्या घरी (किरायच्या खोलीत) गेली आरोपी प्रदीप चौधरी या नराधमाने, माझ्या घरची कणीक घेऊन जा असे म्हणाला. (वैष्णवी पिढीत मुलगी) हिच्या मामीला पोळी टाकून देण्याची मागणी केली मामीने नकार देत, माझ्याच घरच्या कणकीच्या पोळ्या टाकून देत असे म्हणाली. मुलीच्या मामीने नकार दिला म्हणून मुलीला वैष्णवी हिला आरोपीने हाक दिली. ‘बाली’ इकडे ये म्हणत घरात बोलावून, दरवाजा बंद करून मागून तोंड दाबून, नराधमाने मुलीशी अतिप्रसंग करत बलात्कार केला.
मुलगी जखमी झालेल्या अवस्थेत होती. मामा मामीला माहित होताच त्यांनी आरोपीला ठेचण्याचा प्रयत्न केला. पोलिस तक्रार केली. परंतु पोलिस काही लवकर घटनास्थळी आले नाही. आरोपीच्या बायकोचे सत्तापक्षाशी असलेले संबंध व लखपती असण्याचा माज आरोपींमध्ये ठासून होता. बऱ्याच वेळानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली . पण वस्तीत पता लागू दिला नाही. पिडीतांच्या परीवाराचे म्हणणे आहे, की प्रकरण दडपण्याचा प्रकार चालू आहे. आमची परिस्थिती गरीब असल्यामुळे पिडीत मुलीच्या परिवारावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. बाजूलाच नगर सेवकाचे घर असून त्यांनी एक शब्दही बोलला नाही. त्या वार्डाची नगरसेविका हिचा नवरा म्हणाला पळवून लावतो.
पोलिस प्रशासनाने हे प्रकरण पैसा व सत्तेच्या बळावर दडपण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप ऑल इंडिया पँथर सेनेला पिडीतांनी सांगितला. मुलीचा मेडिकल रिपोर्ट पोलिस देत नाही. प्रकरणाला 15 दिवस जवळ पास झाले आहे तरीही रिपोर्ट मिळत नाही व आरोपीचा परिवार पिडीत मुलीच्या परिवारावर दबाव आणत आहे. मारुन टाकण्याच्या धमकी देत आहे. चुटकी वाजून नवऱ्याला बाहेर काढणार तुमच्या सारख्या भिकाऱ्यांना मी विकत घेतो, अशी आरोपीची बायको वारंवार बोलून पिडीत परीवारास धमकी देत आहे.
पिडीत परीवारास न्याय मिळावा या उद्देशाने रेणुका ताई कुंभारे, ऑल इंडिया पँथर सेना हिंगणा तालुका महिला अध्यक्ष यांनी पिडीत परिवाराला धीर देत विशाल गेडाम विदर्भ उपाध्यक्ष यांना व हिंगणा तालुका युवा अध्यक्ष राहूल पारवे यांना माहिती दिली. आज दुपारी 2 वाजता तहसिल कार्यालयावर मोर्चा काढून वैष्णवीस न्याय मिळवून देण्यासाठी मागणीचे निवेदन दिले.