तुमच्या असल्या धमक्यांना भीक घालीत नाही; एकनाथ शिंदे

तुमच्या असल्या धमक्यांना भीक घालीत नाही; एकनाथ शिंदे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गुवाहाटी: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट यांच्यात राजकीय मैदानात जोरदार संघर्ष सुरु आहे. शिवसेनेने बंडखोर एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्यासह १२ आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे. त्यानंतर खुद्द एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरुन शिवसेनेवर तोफ डागली आहे. 12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही.

कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत.कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे, असं ट्विट करुन शिंदे यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिलं आहे.

ट्विटरवर एकनाथ शिंदे म्हणाले, कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो! घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत. शिवसेनेचे नाराज मंत्री आणि नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांचे समर्थक असलेल्या जवळपास ४० आमदारांसोबत बंड करुन शिवसेनेची कोंडी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी लागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट यांच्यात राजकीय मैदानात जोरदार संघर्ष सुरु आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles