ग्रामीण भागात आवडीने चाखली जातेय लोणच्याची चव

ग्रामीण भागात आवडीने चाखली जातेय लोणच्याची चव



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_लोणचे बनविण्याची पारंपारीक पद्धत अजूनही टिकून_

सुभाष चौगले,कुडूत्री(प्रतिनिधी)

आधुनिक जमान्यात विविध लोणचे तयार करण्याच्या अनेक ब्रँडेड कंपन्या आल्या असल्या तरी ग्रामीण भागात पूर्वापार चालत आलेली आणि पावसाळ्यापूर्वी लोणचे घालण्याची पद्धत अजूनही टिकून असून आहाराची गोडी वाढवणारी लोणची घालतांना ग्रामीण भागात अजूनही पाहायला मिळत आहे.

पारंपारिक आणि पूर्वजांपासून ग्रामीण भागात लोणची तयार करण्याची परंपरा अजूनही ग्रामीण भागातील लोकांनी जपली आहे. मृगाचा पहिला पाऊस सुरू झाला, की लोणच्यास लायक असलेले आंबे घरी आणून त्यापासून लोणचे बनवले जाते.ते तयार करण्यासाठी बरीच दक्षताही घेतली जाते.तयार होणारे लोणचे आहाराची रुची वाढवते अगदी लहाणापासून वयोवृद्धांपर्यंत आवडीने खाल्ले जाते.

आधुनिक काळात लोणचे तयार करण्याच्या वेगवेगळ्या कंपन्या आल्या असल्या तरी घरच्या लोणच्याची चव मात्र वेगळीच असते.तयार केलेले लोणच्याची साठवण करून अनेक महिने त्याची रुची चाखली जाते.भात रोप लागणीच्या काळात ही लोणची दुपारच्या आहारात सर्रास ग्रामीण भागात पहायला मिळतात.घरोघरी तयार होणारी लोणची यासाठी वयोवृद्धांची मार्गदर्शन घेतले जाते ते मार्गदर्शन मात्र वेगळेच असते.आणि त्यांच्या अनुभवातून हे लोणचे बनवले जाते व टिकवले जाते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles