

जागतिक योग दिनानिमित्त औ. प्र. सं. हिंगणातर्फे प्रवेश प्रचार जनजागृती रॅलीचे आयोजन
_हिंगणा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत योग सप्ताहाचे आयोजन_
सतीश भालेराव नागपूर
नागपूर/हिंगणा: शहरात दि. २१ ते २७ जून २०२२ पर्यंत “योग सप्ताह” आयोजित करण्यात आला आहे. जागतिक योग दिनानिमीत्त औद्योगिक प्रशिक्षण संस्था वानाडोंगरी, तालुका हिंगणा येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. आठवे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने योगाचे धडे गिरवण्यात आले.
यामध्ये सर्व प्रथम सुर्य नमस्कार, योगासनातील वेगवेगळ्या आसने यामध्ये पद्मासन, वज्रासन, मयुरासन, हस्तपादासन, भुंजगासन, या आसनांची प्रात्यक्षिक करून सीमा पुंड यांनी करुन दाखविले व सर्व मुलामुलींकडून प्रात्यक्षिक करवून घेण्यात आले. व तसेच योग विद्यार्थ्यांना विद्यार्थी जिवनात खूप महत्त्वाचे आहे. शारिरीक व मानसिक आरोग्याला समतोल राखण्यासाठी रोज योग करणे अत्यंत गरजेचे आहे, असे महत्त्वाचे मार्गदर्शन करण्यात आले.
औद्योगिक प्रशिक्षण संस्था वानाडोंगरी, हिंगणा येथे प्रवेश प्रचार व प्रसारासाठी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या अर्चना चवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीचे प्रमुख जाधव सर, तथा एस.टी. गणवीर सर होते. यावेळी क्रीडा मार्गदर्शक हिंगणा सतीश भालेराव यांचें विषेश सहकार्य लाभले.
सतीश भालेराव यांनी (आर.एस.पी. रोड सेफ्टी पेट्रोल) रोड सेफ्टी पेट्रोलचे महत्व विशद करून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करुन ट्राफीक नियम समजावून दिले. यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची सर्व विभागातील शिक्षक एस.टी. गणवीर, यशवंत जाधवर, एस.सी. गोतमारे, सीमा पुंड, वर्षा मेश्राम, वर्षा संदीप भरणे, व विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.