‘हिंदुत्व’ विकणा-या बंडखोरांनी केली ५० कोटीची ‘डील’

‘हिंदुत्व’ विकणा-या बंडखोरांनी केली ५० कोटीची ‘डील’



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मुंबई: महाराष्ट्राची सत्ता काबीज करण्यासाठी प्रत्येक आमदारांना ५० कोटी देऊन आमदार फोडल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून पुढे आल्याचे खात्रीलायक वृत्त असून अनेकांनी यास दुजोराही दिला आहे. ‘हिंदुत्व’ विकणारे बंडखोर आमदार भाजपाने प्रत्येकी २० कोटी रू देऊन खरेदी केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. पहाटेला शपथविधी करुन राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा भाजपचा पहिला प्रयत्न फसल्याने आता शिवसेना फोडून मुंबईवर कब्जा करण्याचा दिल्लीतील भाजपवाल्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या सर्वानीच एकत्र येण्याची गरज आहे.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेचा एक मोठा गट त्यांच्या सोबत आहेत तर काही आमदार आजही उद्धव ठाकरे यांच्या सोबत एकनिष्ठ असल्याचं सोबत असल्याचे जाहीरपणे सांगत आहेत. दरम्यान कन्नड-सोयगांव मतदारसंघातील आमदार उदयसिहं राजपूत यांचा कार्यकर्त्याशी बोलतांनाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून त्या आमदार उदयसिहं राजपूत आपण उद्धव ठाकरे यांच्या सोबत गद्दारी करणार नसल्याचे स्पष्ट सांगितलं आहे तर आपण ५० कोटीची ऑफर धुडकाऊन ‘वर्षा’ बंगल्यावर असल्याचं सांगत आहेत.

दरम्यान माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले की,जनतेने, स्थानिक नेत्यांनी माझ्यावर प्रेम, विश्वास दाखवला, त्याला कदापी तडा जाऊ देणार नाही. एकवेळ मरण पत्करेन, पण शिवसेनेशी कधीही गद्दारी करणार नाही, अशा प्रांजळ भावना आमदार उदयसिंह राजपूत यांनी व्यक्त केल्या.

*शिवसेनेमुळे मी आमदार*

राजपूत म्हणाले, विधानसभा निवडणूक लढलो,पण नशिबाने नेहमीच मला हुलकावणी दिली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी माझ्यावर विश्वास टाकत उमेदवारी दिली आणि मी निवडून आलो. शिवसेनेने मला विधानसभेत जाण्याची संधी दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लूटले याचा वचपा काढण्यासाठीच गुजराती दिल्लीमेट भाजप नेते महाराष्ट्र लुटण्याचे षडयंत्र करीत आहेत. आणि त्याला महाराष्ट्राच्या छाताडावर बसून लुटण्यास मदत करणारे जावळीचे मोरे याच महाराष्ट्रात जन्मले आहेत. आता शत्रुची फौज मोजू नका. आपल्या महाराष्ट्रातील फितूर मोजा असं म्हणण्याची पाळी महाराष्ट्र जनतेवर आली आहे. कोण कुठल्या पक्षात आहे हे आज महत्त्वाचे नाही महाराष्ट्र गुजराती नेत्यांपासून वाचवायचा आहे हे आता प्रत्येक महाराष्ट्रातील माणसांने आज लक्षात ठेवावे. तरच महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई आणि महाराष्ट्र वाचू शकेल. महाराष्ट्राच्या शत्रुंना वेळीच ओळखा. अन्यथा भविष्यात पश्चाताप करण्याची वेळ महाराष्ट्रातील जनतेवर येऊ शकते हेही तेवढेच सत्य आहे.

महाराष्ट्रातील आराध्य दैवत असलेल्या संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज यासारख्या संत महात्म्यांना सन्यांसाची मुले म्हणून वाळीत टाकणारे हिंदूचं नेतृत्व करणार आहेत का? असाही सवाल आता उत्तरासाठी विचारल्या जात आहे. मागील पाच दिवसापासून तापलेले राजकारण व सत्तासंघर्ष इतक्या लवकर शमणार नाहीच. कारण आता कायद्याच्या चौकटीत या बंडखोरांना बसविल्याशिवाय बाजू भक्कम होणार नाही. ठाणे ते सूरत व सूरत ते गुवाहाटी हा प्रवास खर्च व राहण्याच्या खर्चासह चार्टर विमानसेवा यासाठी लागलेला खर्च एकूण ३,००० कोटीच्या घरात गेला आहे. तो सर्व खर्च हा ठरलेल्या डीलप्रमाणे होत आहे. हे नाकारता येणे शक्य नाही.

पहिला प्रयत्न फसला म्हणून, शिवसेनेतील हिंदू नेत्यांवर ई.डी.ची कारवाई सुरु करण्यात आली.तरीही शिवसेनेचे आमदार गळाला लागत नसल्याने आता करोडोंचा सौदा करुन शिवसेनेतील स्वार्थी, संधीसाधू, विश्वासघातकी,आमदारांना मोठी करोडोंची आमिषे दाखवून महाराष्ट्रातून गुजरात सूरत येथे रातोरात आमदारांना पळवून नेऊन नजरकैदेत ठेवण्यात आले.आणि करोडोंच्या सौदेबाजीत काही अपक्ष आमदारदेखील सामील होऊन दिल्लीमेट भाजपला महाराष्ट्र विकायला छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि हिंदूहृयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा वारसा सांगणारे बंडखोर आमदार तयार झाल्याने अशा आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील जनतेनेच राजीनामा देण्यास भाग पाडण्यासाठी आता एकत्रीतरित्या रस्त्यावर उतरणे गरजेचे बनले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles