नागपुरातही शिवसैनिक आक्रमक; एकनाथ शिंदेंचे पोस्टर फाडले

नागपुरातही शिवसैनिक आक्रमक; एकनाथ शिंदेंचे पोस्टर फाडले



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर : महाविकास आघाडी सरकार बरखास्त करण्याच्या उद्देशाने मागील पाच दिवसापासून शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याच पक्षाच्या विरुध्द बंड पुकारल्याने शिवसेनेचा वाघ हादरून गेला. तब्बल 37 आमदार घेवून थेट गुवाहाटीला ठीय्या मांडून बसले आहेत. मात्र महाराष्ट्रात शिवसैनिक शिंदे विरुद्ध आन्दोलन करतांना दिसत असून आज दि २५ जून रोजी त्याचे पडसाद नागपुरातही दिसून आले.

*शहरात अनेक ठिकाणी शिंदेंचे पोस्टर फाडले*

शनिवारी नागपूर शहर युवासेना, ज़िल्हा युवासेना ज़िल्हा प्रमुख विक्रम राठोड़, यांच्या नेतृत्वात मध्य नागपूर येथील गांधी पुतळा चौक महाल येथे एकनाथ शिंदे समर्थनात लावण्यात आलेले बैनर व पोस्टर फाडण्यात आले. यानंतर नागपूर शहरात जिथे कुठे एकनाथ शिंदे समर्थनात बैनर लावण्यात आले तर त्यांनाही असेच करण्यात येईल अशी चेतावनी सुद्धा देण्यात आली.

शिवसेना शहर प्रमुख प्रवीण बरडे, धीरज फंदी, मनोज शाहु, संजय कसोधन, वसंत डोंगरे, प्रफुल तांडीए, छगन सोनवाने, निलेश सतीबावणे, बाबा लरोकर,शांतनु शिर्के, आशीष डोरले,सोनु गड़ेकर, अभिजीत दर्लिंगे, अनुराग लारोकर, आशिष खडसे,पापा बैरिकर, आणी शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles